Nobel Prize 2022: फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो यांना साहित्यातील नोबेल जाहीर

124

जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी अर्नो यांना जाहीर करण्यात आला आहे. अॅनी अर्नो यांनी फ्रेंच, इंग्रजी भाषेत कांदबरी, लेख, नाटके आणि चित्रपटांसाठी लेखन केले आहे. अॅनी यांनी साहित्यातून सामाजिक बंधनांच्या पलिकडे जाऊन लेखन केल्याने त्यांना या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

(हेही वाचा – ७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार)

अॅनी अर्नो यांचा जन्म १ सप्टेंबर १९४० रोजी झाला असून त्या फ्रेंच लेखिका आणि साहित्य विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्यांचे साहित्यिक कार्य बहुतेक आत्मचरित्रात्मक आणि समाजशास्त्रावर आधारित आहे. अॅनी अर्नो यांना ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या साहित्यात याचा प्रभाव दिसून येतो. अॅनी अर्नो यांनी १९७४ मधील Les Armoires vides या आत्मचरित्रपर कांदबरीद्वारे साहित्यिक प्रवासाला सुरुवात केली. तर १९८४ मध्ये त्यांना La Place या कादंबरीसाठी रेनॉडॉट पुरस्कारही मिळाला होता.

गेल्या वर्षीचा नोबेल साहित्य पुरस्कार टांझानियामध्ये जन्मलेल्या आणि ब्रिटनमध्ये स्थायिक असलेले लेखक अब्दुलराझक गुरनाह यांना जाहीर करण्यात आला होता. त्यांच्या कादंबरीत व्यक्ती आणि समाजांवर स्थलांतराच्या परिणामावर भाष्य करणारे साहित्य होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.