नितीन देसाईंवर होते तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; एन. डी. स्टुडिओही होता जप्तीच्या वाटेवर

आत्महत्येचे खरे कारण अद्याप अस्पष्ट

186
नितीन देसाईंवर होते तब्बल 'इतक्या' कोटींचे कर्ज, एन. डी. स्टुडिओही होता जप्तीच्या वाटेवर
नितीन देसाईंवर होते तब्बल 'इतक्या' कोटींचे कर्ज, एन. डी. स्टुडिओही होता जप्तीच्या वाटेवर

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब बुधवारी सकाळी समोर आली. त्यांच्या आत्महत्येचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, मृत्यूपूर्वी देसाईंवर तब्बल २४९ कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती उजेडात आली आहे. आर्थिक विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

नितीन देसाई यांचा मृतदेह एन.डी. स्टुडिओतील त्यांच्या खोलीत आढळून आला. सफाई कर्मचारी खोलीत साफसफाईसाठी गेले असता ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने ही खबर पोलिसांना देण्यात आली. आत्महत्येचे वृत्त कळताच कर्जत व खालापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी या घटनेचा सर्वच अंगाने तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले.

(हेही वाचा – Nuh Violence : हरियाणातील हिंसाचार चिघळला; २२ एफआयआर दाखल तर, १५ जणांना अटक)

एन. डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार

ठराविक मुदतीवर घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे नितीन देसाईंच्या कर्जत चौक येथील एन. डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार होती. कलिना येथील एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने एन. डी. स्टुडिओ जप्तीसाठी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जही केला होता. परंतू, जिल्हाधिकारी कार्यालयाने जप्तीच्या कारवाईला अंतिम मंजुरी दिली नव्हती. रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी एन. डी. स्टुडिओच्या जप्तीसंबंधीचा अर्ज आपल्या कार्यालयाला मिळाल्याची पुष्टी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.