NASA Sun Missions : आदित्य L 1 च्या आधी नासाच्या १४ सूर्यमोहिमा

95
NASA Sun Missions : आदित्य L 1 च्या आधी नासाच्या १४ सूर्यमोहिमा
NASA Sun Missions : आदित्य L 1 च्या आधी नासाच्या १४ सूर्यमोहिमा

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (NASA Sun Missions) सूर्यावरील संशोधनासाठी आदित्य एल-1 यान प्रक्षेपित केले आहे. इस्रोचे सूर्यावरील हे पहिले संशोधन आहे. जगातील इतर देशांकडून याआधी 20 हून अधिक मोहिमा सूर्यावर पाठवण्यात आल्या आहेत. अनेक देशांना त्यामध्ये यशही मिळाले आहे. भारतापूर्वी अमेरिकेनेही सूर्याकडे अंतराळयान पाठवले आहे.

(हेही वाचा – Kirit Somaiya : कोविडकाळात उद्धव सेनेने केला १३२ कोटींचा खिचडी घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप)

विविध देशांकडून सूर्यावर 22 मोहिमा

विविध देशांकडून आतापर्यंत 22 मोहिमा सूर्यावर पाठवण्यात आल्या आहेत. यापैकी अमेरिका, जर्मनी आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांनाच केवळ मोहीम पूर्ण करता आली आहे. नासाने सूर्यावर सर्वाधिक मोहिमा पाठवल्या आहेत. युरोपियन स्पेस एजन्सीने 1994 मध्ये पहिली सूर्य मोहीम पाठवली, ज्यामध्ये त्यांना नासाने मदत केली होती. नासाने आतापर्यंत सूर्यावर 14 मोहिमा पाठवल्या आहेत. सूर्यावरील संशोधनात नासाचे (NASA Sun Missions) ‘पार्कर सोलर प्रोब’ आघाडीवर आहे. त्याने 26 वेळा सूर्याभोवती प्रदक्षिणा घातली आहे. सौर वाऱ्यांचे नमुने घेण्यासाठी नासाने 2001 मध्ये जेनेसिस मिशन देखील सुरु केले.

नासाने अनेक सूर्य मोहिमा पाठवल्या आहेत. यामध्ये SOHO (सोलर आणि हेलिओस्फेरिक ऑब्जर्वेटरी), पार्कर सोलर प्रोब आणि आयरिस (इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ), हिनोड, सोलर डायनॅमिक्स ऑब्जर्वेटरी इत्यादींचा समावेश आहे. नासाची पार्कर सोलर प्रोब मोहीम सूर्यावरील संशोधनात आघाडीवर आहे. सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचणारे हे एकमेव अंतराळयान आहे.

नासाने 2018 मध्ये ‘पार्कर सोलर प्रोब’ अवकाशात पाठवले. त्याच्या प्रक्षेपणानंतर अनेक वर्षांनी नासाने सांगितलं की, पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या वरच्या वातावरणातून गेले होते. मोहिमेदरम्यान, पार्कर सोलर प्रोबने तिथे उपस्थित असलेल्या चार्ज केलेल्या कणांचे नमुने घेतले. यासोबतच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राची माहितीही गोळा करण्यात आली. पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या पृष्ठभागापासून 65 लाख किलोमीटरच्या त्रिज्येत तिथे उपस्थित असलेल्या उर्जेचा प्रवाह आणि सौर वारा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. (NASA Sun Missions)(NASA Sun Missions)

आदित्य L1 ही भारताची पहिलीच सौर मोहीम आहे. आदित्य L1 मोहीम भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. आदित्य L1 बिंदूजवळील कक्षेत अविरत परिभ्रमण करत राहणार आहे, त्यामुळे सूर्याचे निरीक्षण कोणत्याही अडथळ्याविना आणि कोणतेही ग्रहण न होता करता येईल. या यानावर सात उपकरणे असतील, त्यांच्याद्वारे सूर्याचे फोटोस्फीअर, क्रोमोस्फीअर, सौर किरीट यांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.