Naresh Goyal : जेट एअरवेजच्या मालकाची 538 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

193
Naresh Goyal : जेट एअरवेजच्या मालकाची 538 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने जेट एअरवेज आणि नरेश गोयल (Naresh Goyal) कुटुंबाशी संबंधित 538.05 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (जेआयएल) विरुद्ध मनी लाँड्रिंग तपासात पीएमएलए, 2002 च्या तरतुदींनुसार मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल (Naresh Goyal) यांच्यासह अनेक कंपन्या आणि व्यक्तींच्या 17 निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्ता लंडन, दुबई आणि भारतातील आहेत.

जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये 17 निवासी सदनिका/बंगले आणि विविध कंपन्या आणि व्यक्तींच्या नावावर असलेल्या व्यावसायिक परिसराचा समावेश आहे. मेसर्स जेटएअर प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स जेट एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (जेआयएल) चे संस्थापक (Naresh Goyal) अध्यक्ष नरेश गोयल, त्यांच्या पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल हे लंडन, दुबई आणि भारतातील विविध राज्यांमध्ये स्थित आहेत.

(हेही वाचा – Shirshendu Mukhopadhyay : सुप्रसिद्ध बंगाली साहित्यिक शीर्शेंदू मुखोपाध्याय यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर निघाले चित्रपट, कॉमिक)

कॅनरा बँकेच्या लेखी तक्रारीनंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने नोंदवलेल्या एफ. आय. आर. च्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने जेआयएल आणि तिचे प्रवर्तक आणि संचालकांवर फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासघात आणि गुन्हेगारी गैरवर्तनाचे आरोप केले होते. (Naresh Goyal)

एसबीआय आणि पीएनबीच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाने दिलेल्या कर्जाची (Naresh Goyal) जेआयएलने उचलबांगडी केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे, असे एजन्सीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ईडीने 1 सप्टेंबर रोजी गोयल (Naresh Goyal) यांना अटक केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.