Shirshendu Mukhopadhyay : सुप्रसिद्ध बंगाली साहित्यिक शीर्शेंदू मुखोपाध्याय यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर निघाले चित्रपट, कॉमिक

129

शीर्शेंदू मुखोपाध्याय (Shirshendu Mukhopadhyay) यांचा जन्म मैमनसिंग येथे २ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. हा प्रदेश आता बांगलादेशात आहे. मुखोपाध्याय मूळचे बैनखारा, बिक्रमपूर येथील होते. आता हा प्रदेश मुन्शीगंज या नावाने ओळखला जातो. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब कोलकाता येथे स्थलांतरित झाले.

त्यांचे बालपण बिहार, बंगाल आणि आसाम अशा अनेक ठिकाणी गेले. त्यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरी करायचे. बिहारमधील व्हिक्टोरिया कॉलेजमधून त्यांनी इंटरमिजिएट उत्तीर्ण केले. त्यानंतर कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी बंगालीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. शीर्शेंदू मुखोपाध्याय (Shirshendu Mukhopadhyay) हे बंगालीमधले सुप्रसिद्ध लेखक होते. त्यांनी प्रौढांसाठी कथा लिहिल्याच, त्याचबरोबर ते बालगोपाळांच्या मनोराज्यातही रमले. त्यांनी बालकथा देखील लिहिल्या आहेत.

त्यांनी लिहिलेल्या अनेक कादंबरीवर पुढे चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. हिरेर अंगटी यावर याच नावाचा चित्रपट १९९२ मध्ये आला. पातालघोर या कादंबरीवर पातालघर नावाचा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला. साधूबाबर लाथी, नबिगंजेर दैत्तो, छायामोय इत्यादी पुस्तकांवर चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. बंगाली साहित्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

(हेही वाचा ED : नरेश गोयल यांच्या जेट एअरवेजमधील ५३८ कोटींची मालमत्ता जप्त)

त्यांच्या बिपिनबाबूर बिपड या पुस्तकावर आधारित कॉमिक निघाले आहे. स्वप्न देबनाथ यांचे चित्र असलेले ४८ पानांचे कॉमिक आनंदमेला (सप्टेंबर २००६ ते डिसेंबर २००६) या मासिकात प्रकाशित झाले. पारुल प्रकाशनाने पातालघर, बिधू दरोगा, पगला साहेब काबोर आणि पतशगरेर जंगले या त्यांच्या कादंबरीवर आधारित आणखी चार कॉमिक्स प्रकाशित केले आहेत.

त्यांच्या नबाबगंजर आगंतुक या कथेवर आता व्हिज्युअल लिटरेचर एंटरटेनमेंट नवीन पिढीसाठी अॅक्शन कॉमिक्स बनवत आहेत. त्यांची लोकप्रिय बाल कादंबरी म्हणजे गोसाईबागानेर भूत. ही कादंबरी ’द घोस्ट ऑफ गोसाईनबागान’ या नावाने ग्राफिक कादंबरी म्हणून प्रकाशित झाली. विविध प्रकारचे लेखन करणारे मुखोपाध्याय हे भारतीय साहित्यातील महारथी मानले जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.