Narendra Modi : या चिमुकलीचं संगीतावरील कौशल्य पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली स्तुती

मोदींच्या भव्य विजयामागे सोशल मीडियातील प्रचाराचा देखील महत्वाचा वाटा आहे.

141
Narendra Modi
Narendra Modi : या चिमुकलीचं संगीतावरील कौशल्य पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली स्तुती

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ट्विटर आणि इतर सोशल मीडिया मंचावर सक्रिय असतात. तसेच त्यांनी आपल्या इतर मंत्र्यांनाही सक्रिय राहण्याचे आदेश दिले होते. असं म्हटलं जातं की मोदींच्या भव्य विजयामागे सोशल मीडियातील प्रचाराचा देखील महत्वाचा वाटा आहे. आता नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करत लहान मुलीचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केलेल्या ट्विटमध्ये एका लहान मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना मोदींनी लिहलं की, “या व्हिडिओमुळे अनेकांच्या चेहर्‍यावर स्मित हास्य फुलू शकतं. असामान्य प्रतिभा आणि क्रिएटिव्हिटी. शाल्मलीला शुभेच्छा… आता मोदींनी ट्विट केलं म्हणल्यावर हा व्हिडिओ व्हायरल झाला.

(हेही वाचा – Jijamata Udyan : आता राणीच्या बागेत येणार नवे पाहुणे, होणार जागेचा विस्तार)

या व्हिडिओमध्ये बॅक्ग्राऊंडला एक स्त्री कन्नड भाषेत गाणं गात आहे आणि त्या चालीवर ही चुमिकली पियानो वाजवत आहे. या चुमिकलीचं नाव शाल्मली आहे. पियानो वाजवताना ती स्वतः गाणं गुणगुणतेय. तिचा आवाज तर खूप गोड आहे आणि ती जेव्हा पियानो वाजवते तेव्हा आपण मंत्रमुग्ध होतो. (Narendra Modi)

हेही पहा

पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) शेअर केलेला शालमलीचा व्हिडिओ :

हा व्हिडिओ जसा मोदींनी (Narendra Modi) शेअर केल तसा अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सरने देखील शेअर केला आहे. अनेकांनी छान छान कमेंट्स केले आहेत आणि या गोड मुलीला शुभेच्छा व अनेक आशीर्वाद दिले आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल आणि या चिमुकलीचं कौतुक कराल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.