मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा भीषण अपघात!

81

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. कोंबड्यांची वाहतूक करणा-या एका टेम्पोची ट्रकला मागून जोरात धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे.

असा झाला अपघात

सोमवारी सकाळी 6 च्या दरम्यान, झालेल्या या अपघातात जखमी झालेल्यांवर सोमाटणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोंबड्यांची वाहतूक करणारा एक टेम्पो पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पुढे जात असलेल्या एका ट्रकवर भरधाव वेगात धडकला. या धडकेत टेम्पोच्या पुढच्या भागाचा चुराडा झाल्याने या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक कोंबड्यांचा मृत्यूही झाला आहे.

( हेही वाचा: सहा महिन्यांपासून गुणरत्न सदावर्तेंच्या घरी बैठका, पोलीस तपास सुरू )

…तर वेगमर्यादा पाळली जावी

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अनेक अपघात होत असतात. यातील सर्वाधिक अपघात हे भरधाव वेगाने गाडी चालवल्याने, होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जर अपघात टाळायचे असतील तर वेगमर्यादा पाळणे आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.