MSRTC : मुंबई-पुणे महामार्गावरून धावणाऱ्या शिवनेरी बसची जागा शिवाई घेणार? तिकीट दरही होणार कमी

93

वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात १ जून पासून २०२२ रोजी इलेक्ट्रिक बस दाखल झालेली आहे. ‘शिवाई’ असे या बसचे नाव असून या वर्षाअखेरीस २ हजार पर्यावरणपूरक गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर आता एसटीच्या ताफ्यातील शिवनेरी बसची जागा शिवाई ही पर्यावरणपूरक इलेक्ट्रि बस घेणार आहे.

( हेही वाचा : रेल्वेची नवी सुविधा: आता तुमचं स्टेशन आल्यावर रेल्वे करणार तुम्हाला ‘वेकअप काॅल’)

शिवनेरी बससेवा बंद करून शिवाई धावणार 

मुंबई – पुणे महामार्गावर धावणारी शिवनेरी बससेवा ही बंद करून येत्या काही दिवसात या महामार्गावर शिवाई या इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही महिन्यात १०० शिवाई बस धावतील त्याचवेळी या महामार्गावरून शिवनेरी सेवा टप्याटप्याने बंद करण्यात येतील. मुंबई-पुणे प्रवासासाठी शिवनेरी बसचे तिकीट दर सध्या ५३५ रुपये आहे असून शिवाई बसचे भाडे तुलनेने कमी असणार आहे. उदाहरणार्थ आता पुणे नगरपरिषदेत धावणाऱ्या शिवनेरी बसचे भाडे ४१० रुपये आहे तेच शिवाई बससाठी केवळ २१० रुपये तिकीट आकारले जाते. तिकीट दर कमी झाल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनाही काहीसा दिलासा मिळणार आहे.

विद्युतीकरण करण्यासाठी प्रयत्नशील

येत्या काही महिन्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा शिवाई इलेक्ट्रिक बसने जोडण्यात येईल असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ३ हजार बसेसचे नियोजन राज्याच्या अर्थसंकल्पात केले असून सर्व बसेस विद्युतीकरणावर चालवण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. एसटी महामंडळाच्या ‘शिवाई’ला अजित पवारांनी हिरवा कंदील दिला आहे. सर्व बसेसचे विद्युतीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अजित पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.