Pune Porsche Accident : ‘बाळा’च्या आई-वडिलांची कोठडी वाढली!

113
Pune Porsche Accident : 'बाळा'च्या आई-वडिलांची कोठडी वाढली!
Pune Porsche Accident : 'बाळा'च्या आई-वडिलांची कोठडी वाढली!

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Pune Porsche Accident) अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात अग्रवाल पती-पत्नीस येथील विशेष न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता. ५) पोलिस कोठडी सुनावली आहे. वडील विशाल (Vishal Agarwal) व आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) आणि आई शिवानी विशाल अग्रवाल (Shivani Agarwal) यांना रविवारी (२ जून) दुपारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. (Pune Porsche Accident)

तिसरा गुन्हा दाखल 

शिवानी यांनी मुलाच्या ऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. तर या सर्वांत विशाल अग्रवाल यांनी मदत केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार विशाल यांना ससूनमधील डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्हात अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात विशाल यांना अटक करण्याची परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज पोलिसांनी शुक्रवारी दाखल केला होता. या प्रकरणात त्यांच्यावर दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. (Pune Porsche Accident)

आई-वडील व आजोबा अटकेत, मुलगा सुधारगृहात

कल्याणीनगर अपधात प्रकरणातील (Pune Porsche Accident) अल्पवयीन मुलगा सध्या बाल सुधारगृहात आहे. त्याला पाच जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचा आदेश बाल न्याय मंडळाने दिला आहे. तर या गुन्ह्यात मुलाचे वडील, आई आणि आजओवा अटकेत आहेत. अपघातानंतर चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणात विशाल अग्रवाल आणि मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक झाली होती. त्या गुन्ह्यात दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Pune Porsche Accident)

कोठडीत ५ जूनपर्यंत वाढ

अल्पवयीन मोटार चालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डी. अजय तावरे (Ajay Taware) आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनौर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी पाच जूनपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्यात कलमवाढ देखील करण्यात आली आहे. (Pune Porsche Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.