MG 4 EV : ‘या’ कारला म्हणतात इलेक्ट्रिक कारचं भविष्य, असं काय आहे या कारमध्ये?

MG 4 EV : पर्यावरणपूरक तरीही अत्याधुनिक सुविधा देण्यात पुढे असलेली कार अशी एमजी ४ ईव्हीची ओळख आहे

104
MG 4 EV : ‘या’ कारला म्हणतात इलेक्ट्रिक कारचं भविष्य, असं काय आहे या कारमध्ये?
MG 4 EV : ‘या’ कारला म्हणतात इलेक्ट्रिक कारचं भविष्य, असं काय आहे या कारमध्ये?
  • ऋजुता लुकतुके

सध्या एकंदरीतच इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. या कारमध्ये भविष्यवेधी सुविधा आणि तंत्रज्जान कसं बसवता येईल यासाठी जगभरातील कंपन्या प्रयत्न करत आहेत. मॉरिस गराज या अमेरिकन कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात यायला वेळ घेतला. पण, एकदा आल्यावर त्यांनी अक्षरश: धडाका उडवून दिला आहे. २०२३ च्या ऑटोएक्स्पोमध्ये जगभरात कंपनीची एमजी ४ ईव्ही ही कार गाजली आहे. आता भारतीय या कारच्या प्रतीक्षेत आहेत. ती वेळही जवळ आली आहे. नावाप्रमाणे ही मॉरिस गराज कंपनीची चौथी इलेक्ट्रिक कार असणार आहे. (MG 4 EV)

(हेही वाचा- Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळणार ?)

तगड्या कामगिरीसाठी एमजी गाड्या प्रसिद्ध आहेत. इलेक्ट्रिक श्रेणीतही कंपनीने तो लौकिक कायम ठेवला आहे. एमजी ४ ईव्ही २ बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध असेल. ५१ आणि ६४ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी १७० आणि २०४ पीएस इतकी शक्ती निर्माण करू शकेल. सगळ्यात महत्त्वाचं एका चार्जिंगमध्ये गाडी ४५० किमी धावू शकेल. (MG 4 EV)

Insert tweet – https://twitter.com/wlodek_knapik/status/1639557609379299328

२.२ किलोवॅट चार्जिंग युनिट असेल तर गाडीची बॅटरी पूर्ण चार्ज व्हायला २० ते २६ तास लागतील. तर १५० किलोवॅट क्षमतेच्या चार्जिंगने अगदी ३९ मिनिटांत गाडी चार्ज होऊ शकेल. गाडीतील डिस्प्ले हा १०.२५ इंचांचा मोठा इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. तर चालकासमोरचा डिस्प्लेही १० इंचांचा आहे. चालक आणि सहप्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी या गाडीत घेण्यात आली आहे. चालक आणि प्रत्येक सहप्रवाशासाठी एअरबॅग देण्यात आली आहे. त्याचबरोबर चालकाने मार्गिका बदलली, पुढील किंवा मगील गाडीतील अंतर कमी झालं तर कारची एबीएस यंत्रणा ताबडतोब चालकाला याची कल्पना देईल. चालक स्वयंचलित ब्रेक दाबून ताबडतोब गाडी थांबवू शकेल. (MG 4 EV)

(हेही वाचा- Mumbai 26/11 Attack ला त्याच वेळी प्रत्युत्तर द्यायला हवे होते; एस्. जयशंकर यांचे परखड उद्गार)

भारतात लाँच झाल्यावर या गाडीची स्पर्धा असेल ती किया ईव्ही ६ आणि ह्युंदे आयोनिक ५ या गाड्यांशी. एमजी ४ ईव्हीची भारतातील किंमत ३० लाख रुपयांपासून सुरू होईल, असा अंदाज आहे. (MG 4 EV)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.