National Ayurveda Day : प्रत्येक व्याधीला ‘मेडिसिन’ हा पर्याय नाही – वैद्य संतोष जळूकर

जराशा दुखण्या-खुपण्यासाठी भलीमोठी गोळ्यांची यादी लिहून देण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत.

66
National Ayurveda Day
National Ayurveda Day

जराशा दुखण्या-खुपण्यासाठी भलीमोठी गोळ्यांची यादी लिहून देण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. मात्र, प्रत्येक व्याधीला ‘मेडिसिन’ हा पर्याय नसून, आचार-विचार, आहार-विहार यांच्या जोडीला अन्य शारीरिक बाबींचा योग्य समतोल साधल्यास अनेक व्याधी आपसूकच दूर होतील, असे मत वैद्य संतोष जळूकर यांनी व्यक्त केले. (National Ayurveda Day)

राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, आयुर्वेद विज्ञान मंडळ मुंबई आणि वैद्यराज व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी धन्वंतरी पूजन आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ‘ज्येष्ठांचे आरोग्य’ या विषयावर वैद्य संतोष जळूकर यांनी मार्गदर्शन केले. मादाम कामा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर, आयुर्वेद विज्ञान मंडळाचे नंदकुमार मुळ्ये, वैद्य कानिटकर उपस्थित होते. (National Ayurveda Day)

वैद्य जळूकर म्हणाले, वृद्धापकाळात रूक्षता वाढते, वजन कमी होते, वाताचे विकार वाढत जातात. त्यामुळे पन्नाशीनंतर जेवणामध्ये तुपाचा समावेश वाढवणे गरजेचे आहे. कारण, आयुर्वेदात तुपाला वृद्धमित्र असे म्हटले आहे. अलिकडे कोलेस्टेरॉल बाबत तक्रारी वाढू लागल्या आहेत. अशावेळी तुप कसे खावे, असा प्रश्न अनेकांना सतावतो. परंतु, अन्नामार्फत पोटात जाणाऱ्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण हे केवळ २५ टक्के असून, ७५ टक्के कोलेस्टेरॉल हे शरीरात स्वतःहून तयार होते. त्यामुळे आहार-निद्रा-आचार यांसह अन्य शारीरिक बाबींचा योग्य समतोल साधणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. (National Ayurveda Day)

(हेही वाचा – Mharashtra Kesari 2023 : सिंकदर शेख ठरला महाराष्ट्र केसरी)

आयुर्वेद विज्ञान मंडळाविषयी…

आयुर्वेद विज्ञान मंडळ, मुंबई ही संस्था १९६२ पासून आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. व्याख्यानमाला, शिबिरे, परिसंवाद, निबंध पाठांतर स्पर्धा, मासिकांमधून लेख प्रसिद्ध अशा विविध माध्यमांतून आयुर्वेद शास्त्रविषयक सर्वांगीण कार्य करण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे. गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनतेसाठी मंडळाकडून आयुर्वेदातील विविध विषयांवर माहितीपूर्ण अशी पुस्तिका विनामूल्य किंवा अल्पमूल्य दरात प्रकाशित केली जाते. आयुर्वेदाने दिवसभराच्या आचार-विचार, आहार-विहार यासंबंधी पाळावयाच्या नियमांचे सखोल अभ्यासपूर्ण विवेचन त्यातून केले जाते. (National Ayurveda Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.