Marriage Anniversary Wishes For Husband : तुमच्या लाडक्या नवरोबाला अशा द्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पूर्वी एक काळ होता, जेव्हा पुरुषाला जणू मन नसतं असा समज होता. पुरुष हा कठोर, कणखर, न रडणारा. पण हा समज आता गैरसमज ठरला आहे. त्यामुळे आता तुम्हीही तुमच्या नवर्‍याचे कौतुक करा आणि लग्नाच्या वाढदिवसाला त्याला आवर्जून शुभेच्छा द्या. (Marriage Anniversary Wishes For Husband)

26789
Marriage Anniversary Wishes For Husband : तुमच्या लाडक्या नवरोबाला अशा द्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सगळा कौतुक सोहळा नवर्‍यानेच बायकोचा करायचा असतो असं नाही ना? आता काळ बदललाय, आता लोक पुरुषांच्या मनाचाही विचार करु लागले आहे. पूर्वी एक काळ होता, जेव्हा पुरुषाला जणू मन नसतं असा समज होता. पुरुष हा कठोर, कणखर, न रडणारा. पण हा समज आता गैरसमज ठरला आहे. त्यामुळे आता तुम्हीही तुमच्या नवर्‍याचे कौतुक करा आणि लग्नाच्या वाढदिवसाला त्याला (Marriage Anniversary Wishes For Husband) आवर्जून शुभेच्छा द्या. (Marriage Anniversary Wishes For Husband)

नातं टिकतं ते प्रेम व्यक्त केल्याने. प्रेम मनात असून चालत नाही. ते व्यक्त करावं लागतं आणि अशा खास दिवशी तर प्रेम व्यक्त करणं गरजेचं असतं. म्हणून शुभेच्छा ह्या नातं टिकवण्यासाठी महत्वाच्या असतात. आता शुभेच्छा कोणत्या द्यायच्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण चिंता करु नका. आम्ही तुमच्यासाठी काही शुभेच्छा संदेश इथे देत आहोत. (Marriage Anniversary Wishes For Husband)

(हेही वाचा – Drug Racket : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेट DRI कडून उध्वस्त, १०० कोटींचे कोकेन जप्त)

अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…

पती-पत्नीचे आपले नाते क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावे,
तुझ्या वाचून माझे जीवन कधीही एकटे नसावे,
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊदे उधाण,
आपली जोडी सदैव राहो जन्मोजन्मी, हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
आपल्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
आपले आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली
हॅप्पी ऍनिव्हर्सरी नवर्‍या

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपल्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावा
माझ्या नवर्‍याला खूप खूप शुभेच्छा !

नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असंच फ़ुलावं
वाढदिवशी आपल्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात फक्त एकंच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली सोबत कधीही न तुटो, हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Marriage Anniversary Wishes For Husband)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.