‘Vedat Marathe Veer Daudle Saat’ शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार

‘म्यानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात’ या समस्त मराठीजनांच्या स्पूर्तिदायक गीतातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सात मावळ्यांचा जो उल्लेख आहे, त्यांचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर शाळकरी मुलांना पाहता येणार आहे.

208
‘Vedat Marathe Veer Daudle Saat’ शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार
‘Vedat Marathe Veer Daudle Saat’ शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार
  • सुजित महामुलकर

‘म्यानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात’ या समस्त मराठीजनांच्या स्पूर्तिदायक गीतातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या सात मावळ्यांचा जो उल्लेख आहे, त्यांचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर शाळकरी मुलांना पाहता येणार आहे. (Vedat Marathe Veer Daudle Saat)

ऐतिहासिक चित्रपट “रावरंभा”

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा मावळे यांनी १५००० सैन्यासह आलेल्या बहलोलखान विरुध्द जो पराक्रम केला त्याचे चित्रीकरण असलेला “रावरंभा” (Ravrambha) हा ऐतिहासिक चित्रपट राज्यातील सर्व शाळांमध्ये दाखवण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही परवानगी दोन वर्षांसाठी देण्यात आली आहे. (Vedat Marathe Veer Daudle Saat)

विनंती मान्य, शासन निर्णय जारी

शशिकांत पवार प्रॉडक्शन, सातारा यांनी “रावरंभा” (Ravrambha) हा मराठी चित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्याची मागणी एक पत्र लिहून विनंती केली होती. राज्य शासनाने याबाबात शासन निर्णय जारी केला. “रावरंभा” (Ravrambha) हा ऐतिहासिकदृष्ट्या चांगल्याप्रकारे मांडणीद्वारे निर्मित केलेला मराठी चित्रपट राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखविल्यास इतिहासातील वीरगाथा या माध्यमातून अनुभवता येणार आहे, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. (Vedat Marathe Veer Daudle Saat)

(हेही वाचा – Rafael Nadal : पुनरागमनाच्या स्पर्धेत नदालची उपउपांत्य फेरीत मजल)

शिवरायांचा इतिहास पोहोचवण्याचा उद्देश

चित्रपटाचे निर्माते शशिकांत पवार यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना शासनाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करीत शिवरायांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. सदर मराठी चित्रपटास राज्यातील शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थीनींना दाखविण्यास अटी व शर्तीच्या अधीन राहून शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षापुरती परवानगी दिली आहे. (Vedat Marathe Veer Daudle Saat)

शासनाच्या अटी

हा चित्रपट राज्यातील शाळांमधील १० वर्ष वयोगटापुढील विद्यार्थ्यांनाच दाखविण्यास परवानगी देण्यात येत आहे, चित्रपट पाहण्याची कोणत्याही विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येणार नाही, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणताही अडथळा येणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी, चित्रपट पहाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून रुपये २०/- (रुपये वीस फक्त) पेक्षा जास्त शुल्क आकारता येणार नाही. हा चित्रपट शाळांमधून दाखविताना कोणत्याही प्रकारचा वाद उद्धभवल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास सदर संस्थेस दिलेली परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल, अशा काही अटींवर शासनाने चित्रपट दाखविण्याची परवानगी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षापुरती दिली आहे. (Vedat Marathe Veer Daudle Saat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.