Maratha Empire : कोण आहेत मराठा साम्राज्याचे सर्वात मोठे राजे? अर्थात आमचं राजं छत्रपती शिवाजी महाराज…

छत्रपतींनी मुघल साम्राज्य, कुतुबशाही, आदिलशाही आणि युरोपियन वसाहती यांच्याविरोधात लढा दिला. अतिशय शिस्तबद्ध जीवन ते जगले. प्रभू रामचंद्रांनंतर कोण असा प्रश्न मनात निर्माण होतो तेव्हा ’हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’ हे उत्तम आपसुकच येते.

199
Maratha Empire : कोण आहेत मराठा साम्राज्याचे सर्वात मोठे राजे? अर्थात आमचं राजं छत्रपती शिवाजी महाराज...

अनेक इतिहासकार असे म्हणतात की महाराष्ट्राला केवळ भूगोल नाही तर इतिहास देखील आहे. मग हा इतिहास कोणामुळे आपल्याला मिळाला आहे? काय वाटतं तुम्हाला? अशी कोणती व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने सबंध महाराष्ट्र व्यापून टाकलेलं आहे? असे कोणते राजे आहेत, ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला इतिहास दिला आहे, (Who was the biggest king of the Maratha Empire) असे कोणते महापुरुष आहेत, ज्यांनी महाराष्ट्राकडे जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकली? त्यांचं नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराज… (Maratha Empire)

जेव्हा सबंध भारत गुलामीच्या मानसिकतेत होता, तेव्हा मराठी माणसाने हातात तलवार घेऊन देशाचं रक्षण आणि नेतृत्व केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) लोकांच्या मनात विश्वास निर्माण करुन दिला की हे राज्य, हा देश आपला आहे आणि इथे आपली सत्ता असली पाहिजे. गुलामगिरीची मानसिकता आणि मरगळ त्यांनी नाहिशी केली आणि ’हिंदवी स्वराज्य’ निर्माण करुन दाखवलं. (Maratha Empire)

(हेही वाचा – Dadar Ranade Road हातगाड्यांनी अडवला; शुन्य नंबरच्या नावाखाली वाढल्या ‘या’ गाड्या)

शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे मराठा साम्राज्याच्या उदयाचा काळ

छत्रपतींनी मुघल साम्राज्य, कुतुबशाही, आदिलशाही आणि युरोपियन वसाहती यांच्याविरोधात लढा दिला. अतिशय शिस्तबद्ध जीवन ते जगले. प्रभू रामचंद्रांनंतर कोण असा प्रश्न मनात निर्माण होतो तेव्हा ’हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’ (Chhatrapati Shivaji Maharaj) हे उत्तम आपसुकच येते. शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रशासकीय यंत्रणा सुसंघटित होती, त्यांचे लष्करही बळकट होते. त्यांनी मराठी भाषेचे महत्वही जाणले होते. शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे मराठा साम्राज्याच्या (Maratha Empire) उदयाचा काळ. (Maratha Empire)

शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) केवळ स्वराज्यच निर्माण केले नाही तर ते देशभरातील महापुरुषांचे आदर्श स्थान बनले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन एक मोठी स्वातंत्र्य चळवळ आरंभिली गेली आणि शिवरायांच्या साक्षीने हिंदूंनी ब्रिटिशांना हा देश सोडून जाण्यास लावले. आजही शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) अनेकांना प्रेरणा देत आहेत. त्यांचे साम्राज्य हे मराठा साम्राज्य (Maratha Empire) असले तरी ते अखिल हिंदूंचे नायक होते आणि आहेत. (Maratha Empire)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.