Dadar Ranade Road हातगाड्यांनी अडवला; शुन्य नंबरच्या नावाखाली वाढल्या ‘या’ गाड्या

स्थानिक रहिवाशांच्या तसेच फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर एकूण १६ हातगाड्या उभ्या राहतात, ज्या सर्व शुन्य नंबरच्या आहेत. हा शुन्य नंबर म्हणजे अण्णाच्या या हातगाड्या असल्याचे सांगितले जाते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आधी रस्ते व पदपथ अडवले आता उरलेले रस्तेही या हातगाड्यांनी अडवल्याने लोकांनी चालायचे कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

1526
Dadar Ranade Road हातगाड्यांनी अडवला; शुन्य नंबरच्या नावाखाली वाढल्या 'या' गाड्या

दादरमध्ये आधी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे जनता त्रस्त असतानाच रात्री सात नंतर रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या आडव्या हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने कामावरून सुटणाऱ्या आणि लोकल पकडायला जाणाऱ्या प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करत स्थानक गाठावे लागत आहे. दादर पश्चिममध्ये अशाप्रकारच्या १६ हातगाड्या न्यायमूर्ती रानडे मार्गावर रेल्वे स्थानक (Dadar Ranade Road) ते पुस्तक गल्लीपर्यंत उभ्या केल्या जातात. या हातगाड्या झिरो नंबर नावाने ओळखल्या जात असल्याने या हातगाड्यांवर महापालिकेचे अधिकारी कायमच दुर्लक्ष करत असल्याचे दादरमधील रहिवाशांचे म्हणणे आहे. (Dadar Ranade Road)

दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या जवळील केशव सुत उड्डाणपुलाजवळ सुविधा पासून ते सिग्नल आणि पुढे पुस्तक गल्लीपर्यंत हातगाड्यांवर खजूर, फणस, चिंचा बोरे तसेच इतर खाऊच्या वस्तुंची विक्री केली जाते. दुपारपासून पुस्तक गल्ली परिसरात उभ्या राहणाऱ्या या हातगाड्या संध्याकाळी सात नंतर स्टेशनच्या दिशेने पुढे सरकत सुविधा समोरील जागेपासून ते सावरकर मंडईपर्यंत रस्त्यावर जागा अडवून व्यवसाय करत असतात. (Dadar Ranade Road)

(हेही वाचा – Redevelopment of Building: मराठी माणसांच्या मुळावर उठली उबाठा शिवसेना, विश्राम इमारतीच्या पुनर्विकासाआड उभा ठाकला ‘महेश’)

गर्दीमुळे प्रवाशांना चालणेही अवघड

या मार्गावर एक दिवस आड वाहने उभे करण्यास परवानगी असली असली तरी काही दुचाकी तिथे उभ्याच राहतात, तसेच त्यांचा आधार घेत मग टेम्पो किंवा अन्य वाहनेही उभी केली जातात. त्यामुळे या वाहनांच्या पुढे या हातगाड्या लावल्या जातात. त्यामुळे संध्याकाळी ऐन गर्दीच्यावेळी या हातागाड्यांमुळे वाहतुकीला रस्ता शिल्लक राहत नाही. त्यामुळे वाहने धिम्या गतीने मार्ग काढत जातात. परिणामी स्टेशनला गाडी पकडायला जाणाऱ्या प्रवाशांना तसेच कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना या गर्दीत अडकत धक्के खात चालावे लागते. या हात गाडी वाल्यांबरोबरच हातात वस्तू घेऊन विकणाऱ्यांमुळेही लोकांना अडचण होत आहे. रस्त्यांच्या मधोमध आणि बाहेर जाण्याच्या मार्गावरच हे उभे राहत असल्याने त्यांच्याकडे खरेदी करणाऱ्यांच्या गर्दीमुळे प्रवाशांना चालणेही अवघड होऊ जाते. परंतु पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत आहे आणि रात्री सात नंतर महापालिकेचे अधिकारी जसे महापालिका बंद झाल्याच्या अविर्भावात त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नसतात. (Dadar Ranade Road)

स्थानिक रहिवाशांच्या तसेच फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर एकूण १६ हातगाड्या उभ्या राहतात, ज्या सर्व शुन्य नंबरच्या आहेत. हा शुन्य नंबर म्हणजे अण्णाच्या या हातगाड्या असल्याचे सांगितले जाते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आधी रस्ते व पदपथ अडवले आता उरलेले रस्तेही या हातगाड्यांनी अडवल्याने लोकांनी चालायचे कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबईच्या रस्त्यांवर हातगाड्यांवरून माल विकण्यास पूर्णपणे बंदी असून अशा हातगाड्या जप्त करून त्यांचा चक्काचूर केला जातो, तर मग या हातगाड्या रस्त्यावर आल्या कशा आणि या जप्त का केल्या जात नाही असा सवाल रहिवाशांकडूनही केला जात आहे. (Dadar Ranade Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.