Manoj Bajpayee : एक जबरदस्त अभिनेता; मनोज बाजपेयी यांचा जीवन प्रवास

मनोज बाजपेयी यांनी दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या स्वाभिमान नावाच्या मालिकेतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.

99
Manoj Bajpayee : एक जबरदस्त अभिनेता; मनोज बाजपेयी यांचा जीवन प्रवास

मनोज बाजपेयी हे भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील म्हणजेच बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) हे प्रयोगशील अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९८४ साली शेखर कपूर यांनी दिग्दर्शन केलेल्या बँडिट क्वीन नावाच्या आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या चित्रपटाने आपली चित्रपट सृष्टीतली कारकीर्द सुरू केली. (Manoj Bajpayee)

तसेच १९९८ साली राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या सत्या नावाच्या चित्रपटामुळे मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांची बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण झाली. या चित्रपटाने मनोज बाजपेयी यांना त्या काळातील कलाकारांच्या मुख्य प्रवाहात आणले. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला होता. २०१९ च्या ६७ व्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता. (Manoj Bajpayee)

(हेही वाचा – IPL 2024, MI vs RR : रहदारीत अडकलेली मुंबई इंडियन्स संघाची बस ‘सनी भाईं’नी सोडवली)

या मालिकेतून केली कारकीर्दीची सुरुवात

मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांचा जन्म २३ एप्रिल १९६९ साली बिहार येथील पश्चिम चंपारण्य मधल्या बेलवा बहुवारी नावाच्या छोट्याशा गावात झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण के. आर. हायस्कूल, बेतिया येथे झालं. त्यानंतर मनोज बाजपेयी दिल्लीला गेले आणि त्यांनी रामजस कॉलेजमधून पुढचं शिक्षण पूर्ण केलं. तीन वेळा प्रयत्न करूनही त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच NSD मध्ये प्रवेश मिळू शकला नाही. त्यानंतर त्यांनी बॅरी जॉन यांच्यासोबत थिएटर केले. बॅरी जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज बाजपेयी यांनी रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसोबत मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. (Manoj Bajpayee)

मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या स्वाभिमान नावाच्या मालिकेतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. आशुतोष राणा आणि रोहित रॉय यांनाही याच मालिकेतून ओळख मिळाली. बँडिट क्वीन या चित्रपटाची कास्टिंग करतेवेळी तिग्मांशु धुलिया यांनी मनोज बाजपेयींची ओळख पहिल्यांदाच शेखर कपूर यांच्याशी करून दिली. या चित्रपटामध्ये मनोज यांनी डाकू मान सिंगची भूमिका निभावली होती. (Manoj Bajpayee)

(हेही वाचा – Salman Khan Firing Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायकने शोधली दुसरी पिस्तुल आणि ४ मॅगझीन)

या भूमिकेसाठी मनोज बाजपेयींना मिळाले अनेक पुरस्कार 

मनोजजींनी १९९४ साली ‘द्रोह काल’ आणि १९९६ साली ‘दस्तक’ नावांच्या चित्रपटांतही छोट्या भूमिका साकारल्या होत्या. १९९७ साली मनोजजींनी महेश भट्ट यांनी दिग्दर्शन केलेला तमन्ना नावाचा चित्रपट केला. त्याच वर्षी मनोज बाजपेयी हे राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शन केलेल्या दौड नावच्या चित्रपटातही दिसले होते. १९९८ साली राम गोपाल वर्मा यांच्या सत्या नावाच्या चित्रपटानंतर मनोज बाजपेयींनी (Manoj Bajpayee) कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटातल्या भिखू म्हात्रे नावाच्या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतील मुख्य म्हणजे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार हा आहे. तसेच फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) पुरस्कारही देण्यात आला आहे. (Manoj Bajpayee)

१९९९ सालच्या शूल चित्रपटातील समर प्रताप सिंग नावाच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. अमृता प्रीतम यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित पिंजर या चित्रपटासाठी त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच २०१० साली प्रकाश झा यांनी दिग्दर्शन केलेल्या राजनीती नावाच्या चित्रपटात वीरेंद्र प्रताप उर्फ वीरू भैय्या नावाच्या भूमिकेने मनोजजींनी (Manoj Bajpayee) अभिनयाची एक नवीन व्याख्या तयार केली. हे पात्र महाभारतातील दुर्योधन या पात्रासारखे आहे. २०१२ साली आलेल्या गँग्स ऑफ वासेपूर-१ या चित्रपटात मनोज बाजपेयी सरदार खानच्या भूमिकेत दिसले होते. त्यावेळी या चित्रपटाचे आणि मनोज यांच्या पात्राचे समीक्षकांनी खूप कौतुक केले. (Manoj Bajpayee)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.