रेल्वेच्या आरक्षित तिकीटात काळाबाजार; विविध रेल्वेस्थानकांची आरक्षित 16 हजार तिकीटे हस्तगत

138

रेल्वेचे आरक्षण मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असताना, आता दुसरीकडे मात्र आरक्षित तिकीटांचा काळाबाजार केला जात आहे. आरक्षित तिकीटांचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशरफ रशीद खान या 36 वर्षीय संशयिताला रंगेहाथ अटक करण्यात आली असून, मनमाड येथील रेल्वेच्या वाणिज्य विभागाने ही कारवाई केली आहे. त्याच्याकडून विविध रेल्वे स्थानकांच्या आरक्षित 16 हजारांची तिकीटे हस्तगत करण्यात आली असून, ही रेल्वेची मोठी कारवाई मानली जात आहे. ज्या शहरात रेल्वेस्थानक नाही पण शहर मोठे आहे. अशा शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट आरक्षित करण्याची सुविधा असते. याची माहिती अनेकांना नसल्याने काही व्यक्ती याचा गैरफायदा घेत आरक्षित तिकीटांचा काळाबाजार करत असतात. असाच प्रकार मालेगाव शहरात उघडकीस आला आहे.

( हेही वाचा: वरळीत पोटनिवडणूक घ्या, मग कळेल, मशाल आहे की चिलीम..!; आशिष शेलार यांची बोचरी टीका )

सापळा रचून ठगाला अटक

मनमाड येथे रेल्वेचे जंक्शन आहे. काही मोजक्या रेल्वे येथे थांबत नसून इतर सर्वच रेल्वे मनमाड येथे थांबत असतात. इथे जवळ असलेल्या मालेगाव शहरात पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट सेवा आहे. मालेगाव शहर हे मोठे शहर असून तिथे रेल्वे सेवा किंवा स्थानक नाही. त्यांना मनमाड शहर रेल्वेसेवेच्यादृष्टीने महत्त्वाचे असून मालेगावात पोस्टात रेल्वेची तिकीटे मिळतात. ही सेवा खरतर अनेकांना माहिती नसते, त्याचाच गैरफायदा घेत काळाबाजार करणारे अनेक लोक या समाजात आहेत. मालेगावात अशरफ रशीद खान हा असाच आरक्षित तिकीटांचा काळाबाजार करत असल्याची माहिती रेल्वेच्या वाणिज्य विभागाला मिळाली होती. त्यानंतर मालेगावमध्ये सापळा रचून या ठगाला पकडण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.