मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात 4 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख रुपये मदतीची घोषणा

90

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे रिक्षा व डंपर यांचा भीषण अपघात झाला. अपघातात रिक्षामधील एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

परीक्षेसाठी जाणा-या विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याजवळ कशेडी घाटामध्ये सोमवारी रिक्षा व डंपरचा भीषण अपघात झाला. अपघातात एकूण 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, यात तीन मुलींचा समावेश आहे. पोलादपूर खेड येथून माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे परतत असताना रिक्षाचा अपघात झाला. खेड येथे परीक्षेसाठी जात असलेल्या गोरेगाव येथील विद्यार्थ्यांचा या अपघातात अंत झाला आहे. या अपघातात तीन मुली आणि एक रिक्षाचालक ठार झाला आहे. वाळूने भरलेला डंपर या रिक्षावर पलटी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे कळत आहे. हालीमा अब्दुल सलाम पोपेरे (23 वर्ष, नांदवी) आसिया सिद्दीकी (20 वर्षे, गोरेगाव), नाजमीन मूफीद करबेलकर (22 वर्ष, सवाद), अमन उमर बहुर (46 वर्षे, गोरेगाव) यांचा मृत्यू झाला आहे.

( हेही वाचा: रस्ते आणि नालेसफाईचे कंत्राटदार वळतात जलवाहिनी दुरुस्तीच्या कामांकडे )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.