Make in India : मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर, 2 अब्ज युनिटची निर्मिती

164
Make in India : मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर, 2 अब्ज युनिटची निर्मिती

मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. केंद्र सरकारच्या (Make in India) ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमामुळे 2014-2022 या कालावधीत देशांतर्गत उत्पादित मोबाईल फोनची एकत्रित शिपमेंट 2 अब्जांच्या पुढे गेली आहे. ग्लोबल रिसर्च फर्म काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार, भारताच्या मोबाईल फोन शिपमेंटमध्ये 23 टक्के वाढ झाली आहे.

देशातील मागणीत वाढ, डिजिटल साक्षरता वाढणे आणि धोरणात्मक सरकारी समर्थन यामुळे हे शक्य झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

(हेही वाचा – Ravi Shastri on No 4 : २०१९च्या विश्वचषकात प्रशिक्षक रवी शास्त्रींना चौथ्या क्रमांकावर कुणाला खेळवायचं होतं?)

स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने फेज्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम (PMP), (Make in India) मेक इन इंडिया, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI), आणि आत्मनिर्भर भारत यासह अनेक उपक्रम सुरू केले आहेत. अलिकडच्या वर्षांत या योजनांमुळे देशांतर्गत मोबाइल फोनचे उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे.

‘मेक इन इंडिया’ (Make in India) उपक्रमांतर्गत, सरकारने टप्प्याटप्प्याने उत्पादन कार्यक्रम सुरू केले आहे. तसेच स्थानिक उत्पादन आणि मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी पूर्णतः तयार केलेल्या युनिट्स आणि काही प्रमुख घटकांवर आयात शुल्क वाढवले आहे. मोबाईल फोन उत्पादनासह 14 क्षेत्रांसाठी सरकारने प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना सुरू केली आहे.

काउंटरपॉईंटचे वरिष्ठ विश्लेषक प्रचीर सिंग यांनी काउंटरपॉईंट (Make in India) अहवालात या प्रवासाला चालना देण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत, स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी टप्प्याटप्प्याने उत्पादन कार्यक्रम आणि संपूर्णपणे एकत्रित केलेल्या युनिट्स आणि प्रमुख घटकांवर आयात शुल्क हळूहळू वाढवणे यासारख्या धोरणांचा वापर करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.