Mahendalal Sarkar : होमिओपॅथीला प्रोत्साहन देणारे महेंदलाल सरकार कोण होते ?

महेंद्रलाल सरकार यांनी 'इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस'ची स्थापना केली. ते कलकत्ता मेडिकल कॉलेजचे दुसरे पदवीधर वैद्यकीय डॉक्टर होते.

85
Mahendalal Sarkar : होमिओपॅथीला प्रोत्साहन देणारे महेंदलाल सरकार कोण होते ?
Mahendalal Sarkar : होमिओपॅथीला प्रोत्साहन देणारे महेंदलाल सरकार कोण होते ?

आज होमिओपॅथी समाजात रुळली आहे. (Mahendalal Sarkar) मॉडर्न मेडिसिन्सचे प्रस्थ असताना देखील लोक होमिओपॅथीचे उपचार घेत आहेत. यामध्ये महेंद्रलाल सरकार यांचे मोठे योगदान आहे. महेंद्रलाल सरकार यांचा जन्म २ नोव्हेंबर १८३३ रोजी कोलकाता पाइकपाडा (मुसिरहाट) या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तारकनाथ सरकार होते. (Mahendalal Sarkar)

महेंद्रलाल ५ वर्षांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यानंतर त्यांची आई त्यांच्या मामाकडे रहायला आली आणि ते ९ वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. आईच्या मृत्यूपश्चात त्यांना मामानेच लहानाचे मोठे केले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले असले, तरी त्यांनी पुढे मोठा पराक्रम केला आहे. त्यांनी भारतात होमिओपॅथीला महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. होमिओपॅथी ही एक महत्त्वाची वैद्यकीय प्रणाली म्हणून त्यांच्यामुळेच स्थापन झाली. (Mahendalal Sarkar)

(हेही वाचा – Maratha Reservation : आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन; मंत्रालय प्रवेशद्वाराला ठोकले टाळे)

महेंद्रलाल सरकार यांनी ‘इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस’ची स्थापना केली. ते कलकत्ता मेडिकल कॉलेजचे दुसरे पदवीधर वैद्यकीय डॉक्टर होते. जरी त्यांनी ॲलोपॅथीचा अभ्यास केला होता, तरीही त्यांनी चिकित्सकीय पद्धती म्हणून होमिओपॅथीचा स्वीकार केला आणि त्याद्वारे उपचार केले.

विशेष म्हणजे ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रामकृष्ण परमहंस और त्रिपुराचे महाराज अशा बड्या लोकांचे डॉक्टर होते. कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना अनेक विषयांवर व्याख्याने देण्याची संधी प्राप्त झाली होती. महेंद्रलाल सरकार यांनी ब्रिटीश मेडिकल असोसिएशनच्या बैठकीत होमिओपॅथी हे पाश्चात्य उपचारांपेक्षा चांगले असल्याचे सांगितले होते. त्यांचा होमिओपॅथीवर प्रचंड विश्वास होता. १८७६ मध्ये महेंद्रलाल सरकार यांनी फादर यूजेन लफॉ यांच्यासमवेत ‘इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ची पायाभरणी केली. ही देशातील सर्वांत जुनी संशोधन संस्था आहे. (Mahendalal Sarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.