केसगळतीची (Beauty Tips) समस्या वेगवेगळ्या कारणांमुळे उद्भवू शकते. यावर रासायनिक उत्पादने वापरण्याचं प्रमाण जास्त आहे. मास्क, हेअर स्प्रे, महागडे सिरम, वेगवेगळ्या प्रकारची तेलं वापरूनही केस गळत असल्याची तक्रार बहुतांश लोकं करतात. अशा वेळी घरच्या घरी केसांच्या वाढीसाठी जेल तयार केल्यास फायदेशीर ठरू शकते. यामुळे केसगळती कमी होऊन केसांची वाढही चांगली व्हायला मदत होते.
आळशीच्या बिया केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरतात. आळशीच्या बियांमध्ये ओमेगा -३ फॅटी अॅसिड्स, प्रथिने, अँण्टीऑक्सिडंटस् असतात. या बियांपासून तयार केलेले हेअर जेल लावल्यास केसांची चांगली वाढ होते. हे हेअर जेल घरी बनवणं सोपं आहे.
(हेही वाचा – KEM : केईएम रुग्णालयात औषध आणि वैद्यकीय साहित्याच्या साठ्याकरता स्वयंचलित व्यवस्थापन प्रणालीचा वापर )
सर्वप्रथम या बिया पाण्यात भिजवाव्यात किंवा पाण्यात उकळवून घ्याव्यात. त्यातून निघणारा चिकट पदार्थात अनेक पोषक तत्त्वे असतात. एका कॉटनच्या कापडातून या बियांचे उकळवलेले पाणी एका वेगळ्या भांड्यात गाळून घ्या. त्यानंतर आळशीच्या बियांचे हे जेल काचेच्या बरणीत भरून ठेवा.
हे जेल केसांना लावून व्यवस्थित मसाज करा. केसांच्या लांबीपासून केसांच्या मुळांना जेल लावा. यात जीवनसत्त्व ई असल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.
हेअर मास्क तयार करण्यासाठी यामध्ये आळशीच्या जेलमध्ये कोरफडीचा गर मिसळा. १० ते १५ मिनिटे लावल्यानंतर केस स्वच्छ धुवा. या उपायाने केस मऊ, मुलायम व्हायला मदत होते.
आळशीच्या बियांचे तेल केसांना लावू शकता. आळशीच्या बियांचे तेल बनवून केसांच्या मुळाशी मसाज करा. यामुळे केस वाढायला मदत होईल. केस मजबूत होतील.
हेही पहा –