Maharashtra Security Force : राज्यात सुरक्षितता वाढवण्यासाठी ‘महाराष्ट्र सुरक्षा दल’करत असलेलं कार्य, जाणून घ्या…

186
Maharashtra Security Force : राज्यात सुरक्षितता वाढवण्यासाठी 'महाराष्ट्र सुरक्षा दल'करत असलेलं कार्य, जाणून घ्या...
Maharashtra Security Force : राज्यात सुरक्षितता वाढवण्यासाठी 'महाराष्ट्र सुरक्षा दल'करत असलेलं कार्य, जाणून घ्या...

महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल (Maharashtra Security Force) ही महाराष्ट्रातील सरकारी सुरक्षा संस्था आहे. जी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कायदा अंतर्गत २०१० मध्ये स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारची कार्यालये, उपक्रम अशी सर्व आस्थापना आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांना अधिक चांगली सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (एम.एस. एस.सी.) ही पोलीस महासंचालक, भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस.) अधिकारी यांच्या अध्यक्षतेशखालील एक कॉर्पोरेट संस्था आहे.

(हेही वाचा – Rape Accused Varun Kumar : बलात्काराचा आरोपी असलेल्या वरुण कुमारची हॉकी लीग स्पर्धेतून माघार )

‘महाराष्ट्र सुरक्षा दला’चे कार्य…

  • राज्य सरकार आणि केंद्र सरकारची कार्यालये, उपक्रम, अशा सर्व आस्थापनांवरील कर्मचारी, महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, महत्त्वाच्या आस्थापना, वित्तीय संस्था, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक प्राधिकरणे आणि बँकांचे संरक्षण करण्यासाठी ‘महाराष्ट्र सुरक्षा दल’ कार्य करते.
  • खासगी व्यावसायिक संस्था, कॉर्पोरेट संस्था, उत्पादन युनिट इ. २०१०च्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियमानुसार, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने २०१०मध्ये संमत झालेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम, २०१०च्या आदेशानुसार, महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. हा कुशल संघ अनेक संस्थांना सुरक्षा प्रदान करण्यात सक्रीय सहभाग घेतो.
  • पोलीस महासंचालकांचे आयपीएस अधिकारी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या कॉर्पोरेट संस्थेचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतात. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे अध्यक्ष हे महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाचे प्रभारी सचिव असतात. बोर्डाचे इतर सदस्य राज्य राखीव पोलीस दलाचे प्रभारी अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त, प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग आणि सचिव यांचाही याअंतर्गत समावेश होतो.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी …
    – महाराष्ट्र सुरक्षा दला सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी mhasecurity.gov.inहे संकेतस्थळ पाहावे.
    -नवीन उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा.
    -नोंदणी झाल्यानंतर नोंदणीकृत युझरनेम आणि पासवर्ड लॉग इन करा.
    -अर्जला फोटो आणि स्वाक्षरी जोडणे आवश्यक आहे.
  • M.S.S.C ची वैशिष्ट्ये
    – M.S.S.C ची वैशिष्ट्ये कर्मचाऱ्यांची निवड कठोर स्पर्धात्मक प्रक्रियेच्या आधारे केली जाते. उमेदवारांची मानसिक आणि शारीरिक चाचणीच्या आधारे परीक्षा घेऊन न्याय दिला जातो.
    – प्रत्येक कर्मचाऱ्याचे बारकाईने निरीक्षण केले जाते. तेथील कठोर शिस्तीचे पालन उमेदवाराला करावे लागते.
    – सर्व निवडलेले कर्मचारी भारतीय दंड संहितेच्या (IPS) कलम 21 अंतर्गत लोकसेवक मानले जातात. त्यांना M.S.S.C च्या कलम 18 (I) नुसार विशेष पोलीस अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे.
  • आतापर्यंत, महामंडळ विमानतळ, मुंबई मेट्रो, सिडको मेट्रो, औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रे, गॅस वितरण आणि पारेषण कंपन्या, वित्तीय संस्था, रुग्णालये, T.I.F.R, द्रुतगती मार्ग, वेस्टर्न कोलफिल्ड इ. सारख्या 300 हून अधिक महत्त्वपूर्ण आस्थापना, औद्योगिक आस्थापना आणि वित्तीय संस्थांना सुरक्षा कवच पुरवत आहे.
    शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी आणि राज्याला उद्योग स्नेही बनवण्यासाठी सुरक्षा पुरवून राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासात महामंडळ निर्णायक भूमिका बजावत आहे.
  • अतिरेकी आणि दहशतवाद्यांच्या धोक्यांपासून आस्थापनांचे संरक्षण करण्यासाठी महामंडळ वचनबद्ध आहे आणि त्याचे ध्येय टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र दलाकडून अथक प्रयत्न सदैव सुरू असतात.

 

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.