Mahakali Caves History in Marathi : चला जाणून घेऊया मुंबईतील महाकाली लेणीचा इतिहास!

198
Mahakali Caves History in Marathi : चला जाणून घेऊया मुंबईतील महाकाली लेणीचा इतिहास!

मुंबई ही केवळ आर्थिक नगरी नसून मुंबईचे स्वतःचे असे नैसर्गिक सौंदर्य देखील आहे. मात्र आता ही नैसर्गिक मुंबई कॉंक्रीटच्या जंगलात हरवली आहे. पण आजही अशी काही स्थळे आहेत, ज्यामुळे मुंबईची प्राचीनता दिसून येते. चहुकडे कॉंक्रीटचं जंगल आणि मध्यभागी (mahakali caves) अंधेरीतील महाकाली लेणी (Mahakali Caves History in Marathi)

(हेही वाचा – Mayawati : मायावती स्पष्टच म्हणाल्या, युती, आघाडी नकोच; स्वबळावर लढणार)

महाकाली लेणीला कसं जायचं ?

महाकाली गुंफा (mahakali caves) ही मुंबई शहरातील दोन लेण्यांपैकी एक आहे, जी सुमारे २००० वर्षे जुनी आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि SEEPZ च्या जंक्शनजवळ ही गुंफा स्थित आहे. अंधेरी कुर्ला रोडला जोडणाऱ्या रस्त्याला महाकाली लेणी रोड असे नाव देण्यात आले आहे. लेणी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि SEEPZ क्षेत्राकडे वळणाऱ्या टेकडीवर आहेत. तुम्ही अंधेरी स्टेशनवरुन थेट महाकाली लेणीला जाऊ शकता. (Mahakali Caves History in Marathi)

ही गुंफा पूर्वी एक बुद्ध मठ होती :

लेण्यांवर अतिक्रमण होण्याचा धोका होता, मात्र आता रस्त्याच्या कडेला स्टीलचे कुंपण घातलेले आहे आणि टेकडीवर तटबंदी असल्यामुळे ही लेणी आता सुरक्षित झाली आहे. ही गुंफा पूर्वी एक बुद्ध मठ होती. तुम्ही ही गुंफा पाहायला जाऊ शकता. काळा बेसाल्ट खडकांपासून बनलेली ही गुहा (mahakali caves) आपल्याला इतिहासात घेऊन जाते. (Mahakali Caves History in Marathi)

जावेद अख्तर आपल्या उमेदीच्या काळात या गुंफेत आश्रय घ्यायचे :

या लेणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आपल्या उमेदीच्या काळात या गुंफेत आश्रय घेत होते. आज ते प्रसिद्ध लेखक आणि गीतकार आहे. एकेकाळी या जागेला कोंडिवित लेणी म्हटले जायचे. पूर्वी हे अनेक बौद्ध भिक्खूंचे निवासस्थान देखील होते. ही गुंफा अजिंठा एलोरा इतकी मोठी नसली तरी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे, हे मात्र खरे. (Mahakali Caves History in Marathi)

(हेही वाचा – Rahul Shewale : गोवंडी येथे मोठ्या जल्लोषात मराठा भवनाचे लोकार्पण)

गुहेच्या मध्यभागी एक शिवमंदिर :

महाकाली गुहेच्या (mahakali caves) मध्यभागी एक शिवमंदिर आहे. येथे मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगात नाणे चिकटवून जो कोणी मनोकामना करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. या मंदिराच्या आवारातील भिंतींवरही काही देवदेवतांची चित्रे आहेत. ही लेणी अंदाजे १ ते ६ व्या शतकाच्या दरम्यान बांधली गेली आहे. (Mahakali Caves History in Marathi)

महाकाली लेणी १९ लेण्यांनी बनलेली आहे :

गुहेच्या आत प्रार्थनागृहे आणि कोठडी आहेत जिथे बौद्ध भिक्खू राहत असत. महाकाली लेणी १९ लेण्यांनी बनलेली आहे. येथे बौद्ध पौराणिक कथा कोरलेल्या आहेत. महाकाली गुंफेतील (mahakali caves) ९वी लेणी सर्वात मोठी आहे, या गुहेत बौद्ध पौराणिक कथा आणि बुद्धाच्या सात प्रतिमा तयार केल्या आहेत. (Mahakali Caves History in Marathi)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले; अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन)

वाचकांनो, मुंबईसारख्या कॉंक्रीटच्या जंगलात आजही ही प्राचीन लेणी आपलं अस्तित्व टिकवून आहे. सरकारने आणखी कठोर पावलं उचलत हे खूप मोठे पर्यटन स्थळ होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच येथी सात्विकता आणि सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न देखील व्हायला हवा. (Mahakali Caves History in Marathi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.