Chhota Kashmir : छोटा काश्मीरला जाण्याचा विचार करताय? मग हा लेख जरुर वाचा

छोटा काश्मीरचे सर्वात जवळचे विमानतळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे छोटा काश्मीरपासून ११ किमी अंतरावर आहे. ३० मिनिटांत तुम्ही छोटा काश्मीरला कॅबद्वारे पोहोचू शकता.

218
Chhota Kashmir : छोटा काश्मीरला जाण्याचा विचार करताय? मग हा लेख जरुर वाचा

“छोटा कश्मीर” (Chhota Kashmir) हे उत्तर पश्चिम मुंबईतील गोरेगावजवळील आरे कॉलनीमध्ये असलेले एक सुंदर उद्यान आहे. काश्मीर खोऱ्यातील निसर्गरम्य आणि सौंदर्याची आठवण करुन देत असल्यामुळे यास “छोटा काश्मीर” (Chhota Kashmir) असे म्हटले जाते. हे उद्यान आरे मिल्क कॉलनी जंगलाच्या हिरव्यागार परिसरात वसलेले आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी केले देशभरातील १५ विमानतळांवरील नवीन टर्मिनल इमारतींचे उद्घाटन)

बोट रायडिंगसाठी प्रसिद्ध :

गोरेगावपासून ३-४ किमी अंतरावर आणि एका छोट्या डोंगराच्या सर्वोच्च बिंदूवर वसलेले हे एक अद्भुत उद्यान, पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ४ एकर परिसरात पसरलेला काश्मीर तलाव हा छोटा काश्मीरच्या (Chhota Kashmir) समोर आणि रस्त्याच्या अगदी वर आहे. हे ठिकाण बोट रायडिंगसाठी प्रसिद्ध आहे.

वैदिक ऋषी कश्यप यांच्या नावावरून ‘काश्मीर’ नावाचा जन्म :

“काश्मीर” हा शब्द संस्कृतमधून आला आहे, असे मानले जाते. याचा अर्थ “पाण्याने ओसाड झालेली जमीन” असा समजला जातो. काश्मीर हे नाव वैदिक ऋषी कश्यप यांच्या नावावरून पडले आहे, अशी आणखी एक समजूत आहे, ज्यांनी मूळ काश्मीरमध्ये लोकवस्ती निर्माण केली. (Chhota Kashmir)

(हेही वाचा – Narayan Rane यांच्या हस्ते होणार एमएसएमई-तंत्रज्ञान केंद्राची पायाभरणी)

कुंटुंब तसेच प्रेमी-युगुलांचेही हे आवडते ठिकाण :

छोटा काश्मीरमधली (Chhota Kashmir) हिरवळ तुम्हाला आकर्षक करेल. हे उद्यान खूपच प्रशस्त आहे, जे जोडप्यांनी भरलेले आहे जे चमकदार बागांमध्ये थोडा वेळ घालवू शकतात. इथे अनेक झाडे असल्यामुळे तुम्ही कोणत्याही झाडाखाली विश्रांती घेऊ शकता. कुंटुंब तसेच प्रेमी-युगुलांचेही हे आवडते ठिकाण आहे. मित्रांसोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणाला भेट दिलीच पाहिजे.

इथे सर्वत्र हिरवळ, बाग आणि तलाव :

विशेष म्हणजे पूर्वी इथे अनेक हिंदी चित्रपटाची शुटिंग झाली आहे. इथे सर्वत्र हिरवळ, बाग आणि तलाव आहे, जिथे तुम्ही बोट रायडिंग करु शकता. छोटा काश्मीरचे (Chhota Kashmir) सर्वात जवळचे विमानतळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे छोटा काश्मीरपासून (Chhota Kashmir) ११ किमी अंतरावर आहे. ३० मिनिटांत तुम्ही छोटा काश्मीरला कॅबद्वारे पोहोचू शकता. तुम्ही आरे डेअरी मिल्क कॉलनीतून जाणाऱ्या ३२६, ३४१, ४५०, ४५१, ४६०, ४७९ या क्रमांकाच्या बस पकडू शकता आणि छोटा काश्मीरला (Chhota Kashmir) येऊ शकता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.