LinkedIn Job Cuts : लिंक्ड-इन कंपनीतून आणखी ७०० जणांची कर्मचारी कपात 

मायक्रोसॉफ्टकडे मालकी असलेल्या लिंक्डइन या कंपनीत दुसऱ्या फेरीतील नोकर कपात करण्यात आली आहे. आणि यावेळी ६६८ लोकांची गच्छंती झाली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवलेलं ईमेल व्हायरल होतंय.

120
LinkedIn Job Cuts : लिंक्ड-इन कंपनीतून आणखी ७०० जणांची कर्मचारी कपात 
LinkedIn Job Cuts : लिंक्ड-इन कंपनीतून आणखी ७०० जणांची कर्मचारी कपात 

ऋजुता लुकतुके

मायक्रोसॉफ्टची एक कंपनी लिंक्ड-इनने ठरल्याप्रमाणे यावर्षी दुसऱ्या फेरीतील नोकर कपात केली आहे. आणि यावेळी ६६८ लोकांना याचा फटका बसला आहे. वित्त, अभियांत्रिकी आणि कुशल कामगार असा विभागातून ही नोकर कपात (LinkedIn Job Cuts)  करण्यात आली आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कोरोना नंतरच्या काळात आलेली मंदी अजूनही गेलेली नाही, असंच ही नोकर कपात सांगते. लिंक्ड-इन कंपनीत जगभरात २०,००० च्या वर कर्मचारी आहेत. आणि यावर्षी झालेली नोकर कपात ही कंपनीचं संख्याबळ ३ टक्क्यांनी कमी करणारी ठरली आहे.

नोकर कपात (LinkedIn Job Cuts) जाहीर करण्यापूर्वी कंपनीने सोमवारी संध्याकाळी सर्व कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला होता. यात कार्यक्षमता आणि जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणून आम्ही नोकर कपातीचा निर्णय घेत असल्याचं म्हटलंय. कंपनीने पाठवलेलं हे ईमेल सध्या व्हायरल झालंय.

टीम, हा अपडेट तुम्हाला द्यावा लागेल, असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. पण, आताचे दिवस इतके आव्हानात्मक आहेत. आणि कंपनीच्या निर्णयामध्ये पारदर्शकता असावी यासाठी काही गोष्टी तुम्हाला कळवणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं. म्हणून हा ईमेल तुम्हाला लिहित आहोत.

(हेही वाचा-Narendra Modi meets Sundar Pichai : पंतप्रधान मोदी आणि गुगल सीईओ पिचाई यांच्यात नेमकी कशावर चर्चा झाली?)

आपल्या संस्थेमध्ये काही महत्त्वाचे बदल आपण करत आहोत. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये आपण जी बिझिनेस उद्दिष्टं समोर ठेवली आहेत, ती पूर्ण करताना आमच्या असं लक्षात आलं की, आपल्याकडे योजनांच्या अंमलबजावणीत काही अडचणी येत आहेत. त्यामुळे कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार काही संरचनात्मक बदल करण्याचं आम्ही ठरवलं आहे. आणि याचाच अर्थ आपल्यातील काहींचे कामाचे स्वरुप बदलणार आहे. तर काहींना कामाला मुकावं लागणार आहे.

संशोधन व विकास विभागातून ५६३, अभियांत्रिकी विभागातून ३६८ लोकांना आपली नोकरी गमवावी लागू शकते किंवा त्यांचं कामाचं स्वरुप बदलू शकतं. हा ईमेल मिळाल्यानंतर पुढच्या एका तासात जर तुम्ही या बदलांचा भाग असेल तर तुम्हाला एक ईमेल येईल. “Required Attendance: R&D Role Reductions” असा त्या ईमेलचा मथळा असेल.

तुम्हाला असा ईमेल आला तर ती बैठक चुकवू नका. कंपनी तुम्हाला अशा परिस्थितीत काय मदत करू शकते याची सविस्तर माहिती तुम्हाला या बैठकीत दिली जाईल.

कंपनीने नोकर कपातीच्या निर्णयानंतर एक प्रसिद्धी पत्रकही जारी केलं आहे. यात हा निर्णय दुर्दैवी पण आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.