Veer Savarkar : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला सदिच्छा भेट

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने जतन करून ठेवलेली वीर सावरकर यांची हस्तलिखिते अंबादास दानवे यांनी पाहिली.    

227
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे स्वागत करताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अस्थायी विश्वस्त शैलेंद्र चिखलकर.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवार, २४ जानेवारी रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत १८५७च्या लढ्यापासून ते १९४७ पर्यंत ज्या क्रांतिकारकांचे योगदान होते, त्यांचा इतिहास म्युरलच्या माध्यमातून स्मारकात उभारण्यात आला, हे पाहून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कौतुक केले.

veer savarkar 6

(हेही वाचा Uddhav Thackeray : शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती; पक्षाच्या अधिवेशनात काय म्हणाले उद्धव ठाकरे?)

वीर सावरकर यांची हस्तलिखिते पाहिली

वीर सावरकर (Veer Savarkar) यांनी अंदमानातील कारागृहात असताना बेड्यांच्या जोखडात राहून कोलू फिरवला. त्या कोलूची प्रतिकृती स्मारकाच्या आवारात ठेवण्यात आली आहे. त्याचीही माहिती अंबादास दानवे यांनी जाणून घेतली. त्यानंतर स्मारकातील कै. वि.श्री. जोशी (क्रांतिकारकांचे चरित्र लेखक) संदर्भ ग्रंथ संग्रहालयाला भेट देऊन त्याचीही पाहणी केली. तसेच स्मारकातील समिती कक्षात चित्रफीत पाहिली. यावेळी स्मारकात वीर सावरकर (Veer Savarkar) यांची जतन करून ठेवण्यात आलेली हस्तलिखितेही अंबादास दानवे यांनी पाहिली. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अस्थायी विश्वस्त शैलेंद्र चिखलकर यांनी अंबादास दानवे यांना वीर सावरकर यांचा अर्धाकृती पुतळा देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमरावती जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, विभागप्रमुख महेश सावंत, विधानसभा संघटिका आरती किनरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.