Ulhas Patil : काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश

धुळे जिल्ह्यातील बाळासाहेब भदाणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचाही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

167
Ulhas Patil : काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश

जळगाव चे माजी खासदार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, यांची मुलगी डॉ.केतकी पाटील,यांनी  बुधवारी (२४ जानेवारी) मुंबईत एका कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ.उल्हास पाटील यांचे भाजपात स्वागत केले.(Ulhas Patil)

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, मोदी सरकारने भारताचे नाव जगात उंचावले आहे. भारताला क्रमांक एकचा देश बनविण्याचा संकल्प केला आहे. अशा नेत्यांच्या हाताखाली काम करायला मिळणे हे सर्व कार्यकर्त्यांचे भाग्य आहे. राज्यातील महायुतीचे सरकारही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळेच डॉ. उल्हास पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ, जाणत्या काँग्रेस नेत्याने भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. (Ulhas Patil)

यावेळी धुळे जिल्ह्यातील बाळासाहेब भदाणे यांच्यासह काँग्रेस, उबाठा गटातील अनेक सरपंच, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे, आ. जयकुमार रावल, आमंदार मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, रावेर ग्रामीण अध्यक्ष अमोल जावळे आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या विकास कामांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावले जातील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी जाहीर केले. (Ulhas Patil)

(हेही वाचा : Chandrasekhar Bawankule: उदयनिधी स्टॅलिनचे मतं उद्धव ठाकरेंना मान्य आहेत का ? बावनकुळे यांचा सवाल)

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा पक्षात यथोचित सन्मान केला जाईल असेही बावनकुळे यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ . उल्हास पाटील यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ.पाटील यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी आणखी बळकट होईल आणि उत्तर महाराष्ट्रात यापुढील काळात आणखी पक्ष प्रवेश होतील, असेही महाजन यांनी नमूद केले. डॉ. केतकी पाटील यांची भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केले. जळगाव मधील डॉ. वर्षा पाटील, देवेंद्रभैय्या मराठे, संदेश पाटील , पुंजाजी पाटील, सुरेंद्र कोल्हे, राजू राणे आदींसह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. धुळे जिल्ह्यातील ६७ सरपंचांनी बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर भदाणे, बापजी आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरत जाधव, धुळे तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, अनिल कचवे आदींचा त्यात समावेश आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.