जॅझ संगीताचा बादशाह : Miles Davis

आपल्या संगीताच्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे माइल्स डेव्हिस हा त्याच्या कारकिर्दीत आघाडीच्या संगीतकारांमध्ये गणला जात होता.

62
जॅझ संगीताचा बादशाह : Miles Davis

माइल्स डेव्हिस (Miles Davis) हा अमेरिकेतला संगीतकार आणि एका बँडचा लीडर होता. तो एक ट्रम्पेटर होता. डेव्हिस हा २०व्या शतकातला प्रचंड प्रतिभाशाली आणि लोकप्रिय संगीतकार होता. तो जॅझ हा संगीत प्रकार वाजवायचा. त्याची कारकीर्द जवळजवळ पाच दशकांची होती. त्याने संगीताच्या जॅझ या प्रकारात वेगवेगळे प्रयोग केले. आपल्या संगीताच्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे माइल्स डेव्हिस हा त्याच्या कारकिर्दीत आघाडीच्या संगीतकारांमध्ये गणला जात होता. (Miles Davis)

माइल्स डेव्हिस (Miles Davis) याचा जन्म २६ मे १९२६ साली अल्टोन, इलिनॉय येथे एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. तर ईस्ट सेंट ल्युईस येथे त्याच बालपण गेलं. किशोरवयातच डेव्हिसने ट्रम्पेट वाजवायला सुरुवात केली. न्यूयॉर्कमध्ये ज्युलियर्ड या ठिकाणी डेव्हिसला शिक्षणासाठी पाठवलं गेलं. (Miles Davis)

(हेही वाचा – Dilip Joshi : सर्वांचे लाडके जेठालाल आहेत तरी कोण?)

डेव्हिसने हा अल्बम केला रेकॉर्ड 

१९४४ ते १९४८ सालादरम्यान प्रसिद्ध सेक्सोफोनिस्ट चार्ली पार्कर याच्या बेबॉप नावाच्या बँडमध्ये डेव्हिस (Miles Davis) सामील झाला. काही काळाने डेव्हिसने कूल जॅझच्या विकासासाठी महत्त्वाचं असलेलं बर्थ ऑफ कूल नावाचं गाणं कॅपिटल रेकॉर्ड्स नावाच्या कंपनीसोबत रेकॉर्ड केलं. १९५० सालच्या दशकाच्या सुरुवातीला डेव्हिस प्रेस्टिज रेकॉर्ड्स नावाच्या कंपनीसोबत काम करत होता. त्यावेळेस त्याने हार्ड बॉप म्युझिक रेकॉर्ड केलं. सुरुवातीचं काही रेकॉर्डिंग ठीक झालं. पण डेव्हिसला पदार्थांच्या सेवनाची सवय होती. त्यामुळे त्याच्याकडून पुढचं काम व्यवस्थित झालं नाही. (Miles Davis)

पण काही काळाने न्यूपोर्ट जॅझ फेस्टिव्हलमध्ये डेव्हिसने (Miles Davis) पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. त्या फेस्टिव्हलमध्ये त्याच्या परफॉमन्सचं लोकांनी खूप कौतुक केलं. पुढे त्याने कोलंबिया रेकॉर्ड्स नावाच्या कंपनीसोबत एक दीर्घकालीन करार केला आणि १९५५ साली ‘राऊंड अबाउट मिडनाईट’ नावाचा अल्बम रेकॉर्ड केला. त्यानंतर डेव्हिसने मागे वळून पाहिलं नाही. डेव्हिसची गाणी खूप लोकप्रिय झाली. (Miles Davis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.