Dilip Joshi : सर्वांचे लाडके जेठालाल आहेत तरी कोण?

दिलीप जोशी यांनी १९८९ साली प्रदर्शित झालेला 'मैंने प्यार किया' नावाच्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

74
Dilip Joshi : सर्वांचे लाडके जेठालाल आहेत तरी कोण?

दिलीप जोशी (Dilip Joshi) हे एक प्रसिद्ध भारतीय अभिनेते आहेत. त्यांचा जन्म २६ मे १९६८ रोजी झाला. ते हिंदी चित्रपट सृष्टीतील तसेच टेलिव्हिजन सिरियलमध्ये अभिनय करतात. त्यांनी केलेल्या कामाचं नेहमीच खूप कौतुक केलं जातं. सध्या सोनी टीव्हीवर सुरू असलेली ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ नावाची मालिका खूप प्रसिद्ध आहे. त्या मालिकेत दिलीप जोशी यांनी ‘जेठालाल’ नावाच्या पात्राची भूमिका साकारली आहे. (Dilip Joshi)

जेठालाल नावाचे हे विनोदी पात्र एक गुजराती व्यापारी असून स्वतःला अनेक छोट्यामोठ्या समस्यांमध्ये अडकवून घेते. त्या समस्यांमधून स्वतःची सुटका करण्यासाठी त्यांची किती तारांबळ उडते. ते पाहतांना प्रेक्षकांना हसू आवरत नाही. त्याच बरोबर या सिरियलच्या प्रत्येक भागामध्ये एक शिकवणही मनोरंजनातून सांगितली जाते. दिलीप जोशी (Dilip Joshi) यांची जेठालाल ही भूमिका लहानांपासून ते थोरांपर्यंत अतिशय लोकप्रिय झाली. (Dilip Joshi)

(हेही वाचा – Lok Sabha Election : दिल्लीत भाजपाला किती जागा मिळणार? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली भविष्यवाणी)

या मालिकांमध्ये साकारल्या भूमिका 

दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी १९८९ साली प्रदर्शित झालेला ‘मैंने प्यार किया’ नावाच्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी रामू नावाच्या नोकराची विनोदी भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी अनेक गुजराती नाटकांमध्ये कामं केली. पुढे त्यांनी ‘ये दुनिया है रंगीन’, ‘क्या बात है’, ‘कभी ये कभी वो’, ‘हम सब बाराती’, ‘हम सब एक है’, ‘शुभमंगल सावधान’, ‘दाल में काला’, ‘मेरी बीवी वंडरफुल’ आणि एक लहान मुलांची विनोदी मालिका ‘अगडम बगडम तिगडम’ नावाच्या मालिकांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या. (Dilip Joshi)

त्यानंतर दिलीप जोशी (Dilip Joshi) हे ‘हम आपके है कौन’ आणि ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ नावाच्या चित्रपटांमध्ये दिसले. दिलीप जोशी यांना INT म्हणजेच इंडियन नॅशनल थिएटर्सकडून बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार प्रदान केला आहे. याव्यतिरिक्त त्यांना उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक अवॉर्ड देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दिलीप जोशी हे पितृभक्त आहेत. (Dilip Joshi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.