U.R. Ananthamurthy : कन्नड साहित्यिक उडुपी राजगोपालाचार्य अनंतमूर्ती

115

कन्नड साहित्यिक उडुपी राजगोपालाचार्य अनंतमूर्ती यांचा जन्म शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्ली तालुक्यात मेलीगे येथे कन्नड भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण दूरवासापुरा येथील पारंपारिक संस्कृत शाळेत सुरू झाले. म्हैसूर विद्यापीठातून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी प्राप्त केली.

त्यानंतर त्यांनी कॉमनवेल्थ स्कॉलरशिपवर पुढील अभ्यासासाठी इंग्लंडला गेले. ’पॉलिटिक्स ऍंड फिक्शन इन द १९३०’ हा प्रबंध लिहून त्यांनी १९६६ मध्ये बर्मिंगहॅम विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. अनंतमूर्ती (U.R. Ananthamurthy) यांनी १९७० मध्ये म्हैसूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात प्राध्यापक आणि प्रशिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. १९८७ ते १९९१ या काळात ते केरळमधील कोट्टायम येथील महात्मा गांधी विद्यापीठाचे ते कुलगुरू होते.

१९९२ मध्ये त्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. १९९३ मध्ये त्यांची साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. मणिपाल विद्यापीठाच्या ह्युमनिटिज विभागाच्या स्थापनेमध्येही त्यांना सहभाग होता. पुढे २०१२ मध्ये त्यांनी मणिपाल सेंटर फॉर फिलॉसॉफी अँड ह्युमॅनिटीज, मणिपाल विद्यापीठात चार महिने व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केले.

(हेही वाचा Maharashtra Assembly Session : हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; पुढील अधिवेशन ‘या’ तारखेला होणार)

त्यांनी अनेक भारतीय आणि परदेशी विद्यापीठांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केले आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्षपद देखील त्यांनी दोन वेळा भुषवले आहे. २०१२ मध्ये त्यांची कर्नाटक केंद्रीय विद्यापीठाचे पहिले कुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीपुरा, भव, बारा, अवस्थ, प्रश्ने, संस्कारा यांसारखी त्यांची साहित्यकृती प्रकाशित झाली आहे.

त्याचबरोबर त्यांनी लघू कथा, कादंबर्‍या देखील लिहिल्या आहेत आणि त्यांच्या साहित्याचे इतर भाषांमध्ये देखील अनुवाद झाले आहेत. त्यांच्या काही कथांवर चुत्रपट सुद्धा बनवण्यात आले आहेत. त्यांना राज्यसभा पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, पद्म भूषण, साहित्य अकादमी फेलोशिप, नाडोजा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.