Jammu Kashmir : जम्मू-काश्मिर मधील चकमकीत २ दहशतवादी ठार

120
Jammu Kashmir : जम्मू-काश्मिर मधील चकमकीत २ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मिर (Jammu Kashmir) मधील कुज्जर-कुलगाममध्ये काल म्हणजेच बुधवार ४ ऑक्टोबर रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाकडून २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दरम्यान, राजौरी जिल्ह्यातील तट्टापाणी भागात सोमवारी सायंकाळी सुरू झालेली दहशतवादविरोधी कारवाई सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होती.

यासंदर्भातील माहितीनुसार कुलगाम जिल्ह्यातील (Jammu Kashmir) कुज्जर भागात बुधवारी सकाळी दहशतवाद्यांची एक टोळी दिसली. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी सैन्याच्या जवानांसह दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कुज्जरमध्ये घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी वेढा तोडून पळून जाण्यासाठी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला.

(हेही वाचा – Nanded Hospital Tragedy : नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल)

दहशतवाद्यांच्या (Jammu Kashmir) गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी त्यांना चारही बाजूंनी घेरण्यास सुरुवात केली. यावेळी सैन्याच्या गोळीबारात 2 दहशतवादी मारले गेले. परिसरात आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता आहे, त्यामुळे परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.