Nanded Hospital Tragedy : नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

117
Nanded Hospital Tragedy : नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वीच ठाणे येथील महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. या घटनेची आता नांदेड (Nanded Hospital Tragedy) येथे पुनरावृत्ती झाली आहे. नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात एका दिवसात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. तर रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे अनेकांकडून सांगितले जात आहे. तर याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

अशातच आता डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Nanded Hospital Tragedy) व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Mumbai High Court : उल्हासनगरमध्ये कायद्याचे राज्य नाही का; का संतापले उच्च न्यायालय)

हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात (Nanded Hospital Tragedy) औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयात वेळेवर औषधांचा पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप केला जात आहे.

नांदेडमधील (Nanded Hospital Tragedy) या सर्व घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.