काश्मिरात अतिरेक्यांचा खात्मा सुरूच! दिवसभरात ‘इतके’ संपवले

पूंछ जिल्ह्यांच्या सीमांवर असणाऱ्या जंगलामधून श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ९ ते १० दहशतवाद्यांनी भारतीय सीमांमध्ये घुसखोरी केली आहे.

122

काश्मिरात दहशतवाद्यांनी धूडगूस घातला होता. स्थानिक आणि परराज्यातील नागरिकांच्या हत्येचे सत्र सुरू केले आहे. त्यावर आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकारने कडक धोरण स्वीकारले आहे. मागील आठवडाभरापासून त्या ठिकाणी लष्कराने अतिरेक्यांचा खात्मा करण्यास सुरूवात केली आहे. दररोज अतिरेक्यांचा खात्मा सुरू केला जात आहे. मंगळवारी, १९ ऑक्टोबर रोजी सहा अतिरेक्यांचा खात्मा केला.

अजून ३-४ दहशतवादी लपलेले असल्याची माहिती

पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये भारतीय लष्कराने ही मोठी कारवाई केली. सैन्याच्या १६ पोलिस बटालियनकडून याच भागात लपून बसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरू आहे. राजौरी सेक्टरमधील चकमकीमध्ये भारतीय लष्कराचे नऊ जवान शहीद झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत यांनी १६ ऑक्टोबर रोजी या प्रदेशाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या भारतीय लष्करातील कमांडर्सची सध्या सुरू असणाऱ्या कारवाईबद्दल चर्चा केली होती. यावेळी या कमांडर्सला स्वत: पुढाकार घेऊन दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता. दहशतवादी स्वत:च बाहेर येऊन हल्ल्याचा प्रयत्न करतील तेव्हा उत्तर द्यावे, असा सल्ला दिला आहे.

(हेही वाचा : …तर हिंदू महासभा हा दुसरा मोठा पक्ष म्हणून पुढे आला असता!)

९ ते १० दहशतवाद्यांची घुसखोरी

दहशतवादी जंगलामधून दोन दोनच्या गटाने हल्ला करत असल्याने भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले, गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमांवर असणाऱ्या जंगलामधून श्रीनगरमध्ये लष्कर ए तोयबाच्या ९ ते १० दहशतवाद्यांनी भारतीय सीमांमध्ये घुसखोरी केली. यापैकी अनेकांचा मुख्य नियंत्रण रेषेजवळच खात्मा करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.