Jammu and Kashmir : सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; कुलगामच्या सामनू येथे जोरदार धुमश्चक्री

3 ते 5 दहशतवादी लपून बसल्याचा संशय

75
Jammu and Kashmir : सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; कुलगामच्या सामनू येथे जोरदार धुमश्चक्री

दक्षिण काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुलगाममधील सामनू येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी परिसराला चारही बाजूंनी घेरले आहे. याठिकाणी 3 ते 5 दहशतवादी लपून बसल्याचा संशय असून दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे.

यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) पोलीस, लष्कराची 34 आरआर बटालियन आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने एका विशिष्ट माहितीवरून कुलगामच्या सामनू गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.

(हेही वाचा – Jammu – Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हिंदू मंदिराजवळ बॉम्बस्फोट)

नाकाबंदी होत असल्याचे पाहून दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला आणि चकमक (Jammu and Kashmir) सुरू झाली. घटनास्थळी 3 ते 5 दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. यासोबतच उत्तर काश्मीरमधील बारामुले जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत दहशतवादी लाँच कमांडर बशीर अहमद मलिकसह दोन दहशतवादी मारले गेले. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांकडून (Jammu and Kashmir) शस्त्रे आणि पाकिस्तानी रोकड जप्त करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.