जम्मू-काश्मीर : सैन्याने नष्ट केली स्फोटके

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि दहशतवादी यांच्यावर आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

87
जम्मू-काश्मीर : सैन्याने नष्ट केली स्फोटके

जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी (१८ जून) सैन्याने दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. लष्कराच्या पुंछ सेक्टरमधील सेरी चौवाना गावात सुरक्षा दलाला स्फोटकांचा मोठा साठा सापडला. त्यानंतर याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले आणि सर्व स्फोटके निकामी करण्यात आली.

(हेही वाचा – नागपूर : तीन चिमुकल्यांचा ‘या’ कारणामुळे झाला खेळता-खेळता मृत्यू)

लष्कराच्या एसओजी टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सैन्याच्या रोमियो फोर्स आणि पूंछच्या एसओजी पोलिसांनी संयुक्तपणे स्फोटके शोधून काढली. ज्यामध्ये ११ जिवंत बॉम्बसह एकूण ६१ स्फोटके व साहित्य नष्ट करण्यात आले. सेरी चौवाना गावातूनच सर्व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके मिळणे हा एक मोठा दहशतवादी कट होता, जो सुरक्षा दलाच्या तत्परतेने हाणून पाडता आला.

यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि दहशतवादी यांच्यावर आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. खोऱ्यातील दहशतवाद संपवण्यासाठी सतत ऑपरेशन सुरू आहेत. सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीच्या आधारे, काही दिवसांपूर्वी कुपवाडा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने मोठी कारवाई केली होती. त्याअंतर्गत पाकिस्तानातून कार्यरत असलेला कुख्यात दहशतवादी असमास रिझवान खानची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.