Drugs : मुंबईत २५ कोटींच्या अमली पदार्थांसह ९७ जणांना अटक

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी ३८ आरोपी हे मुख्य ड्रग्ज (Drugs) तस्कर असून त्यांच्याकडून १९.११ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

144
Drugs : मुंबईत २५ कोटीच्या अमली पदार्थसह ९७ जणांना अटक

मुंबई शहरात ड्रग्जची (Drugs) मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याचे मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मागील सहा महिन्यात केवळ मुंबईमधून जवळपास २५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी ९७ जणांना अटक करण्यात आली असून त्यात ८ नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे.

जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये (Drugs) मेफेड्रोन, कफ सिरपच्या बाटल्या, एलएसडी, हायड्रोपोनिक गांजा, चरस आणि हेरॉईनचा समावेश असून शहराच्या विविध भागातून ते जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ विक्रेत्याचे गुजरात, बिहार, हैदराबाद, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टोळ्यांशी संबंध असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

(हेही वाचा – एमपीएससीच्या परिक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू)

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी ३८ आरोपी हे मुख्य ड्रग्ज (Drugs) तस्कर असून त्यांच्याकडून १९.११ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध यापूर्वीचे १७ गुन्हे दाखल आहे असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ (Drugs) विरोधी पथकाच्या वेगवेगळ्या युनिटने वांद्रे, माहीम, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि भायखळा यांसह शहरातील विविध भागांमध्ये कारवाई करून २५.४० कोटी रुपये किंमतीचा प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त केला, या प्रकरणी ९७ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस सुत्रांच्या म्हणण्यानुसार गुजरात, बिहार, हैदराबाद, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातून मुंबईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पाठवले जातात. या अमली पदार्थ्यांच्या तस्करीसाठी कुरिअर, ट्रान्सपोर्ट कंपन्यांचा वापर केला जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.