Israel Hamas War : गाझा पट्टीवरील इस्त्रायली सैन्याबाबत पंतप्रधान नेतान्याहू यांचं मोठं विधान; म्हणाले …

118

हमासबरोबरचे (Israel Hamas War) युद्ध संपल्यानंतर गाझा पट्टीवरील संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी अनिश्चित काळासाठी इस्रायलवर असेल, असे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हंटले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नेतान्याहू (Israel Hamas War) म्हणाले, “गाझाविरोधात आम्ही पुकारलेलं युद्ध हे स्थानिक नाही. हे जागतिक युद्ध आहे. या युद्धात त्यांचा पराभव करणं महत्त्वाचं असून विजय हा एकमेक पर्याय आहे. आम्ही हमासचा पराभव करु, त्यांना संपवून टाकू असं इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहू म्हणाले आहेत. दरम्यान गाझाविरोधातील युद्ध संपल्यानंतही आपलं सैन्य तिथे तैनात असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. युद्धानंतर आम्हीच गाझामधील सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेऊ. आमचं सैन्य अनिश्चित काळासाठी गाझा पट्टीवर (Israel Hamas War) असेल असं ते म्हणाले आहेत.”

(हेही वाचा – UPI Payment : युपीआय माध्यमातून चुकून पैसे वळते झाले असल्यास काय कराल?)

इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) सोमवारी (६ नोव्हेंबर) सांगितले की त्यांनी गाझामधील (Israel Hamas War) हमासच्या शेकडो लक्ष्यांवर हल्ला केला आहे आणि एका लष्करी परिसराचा ताबा घेतला आहे.

इस्रायल संघर्षात ‘छोट्या विरामांसाठी’ तयार

नेतान्याहू (Israel Hamas War) पुढे म्हणाले की, इस्रायल मानवतावादी मदतीचा प्रवेश सुलभ करण्यासाठी किंवा हमास अतिरेक्यांनी ताब्यात घेतलेल्या बंदिवानांना बाहेर पडण्याची परवानगी देण्यासाठी गाझा लढाईत “डावपेचात्मक छोट्या विरामांचा” विचार करेल.

परंतु इस्रायली नेत्याने हमासशासित पॅलेस्टिनी (Israel Hamas War) एन्क्लेव्हमध्ये बंदिवासात ठेवलेल्या सर्व लोकांची सुटका न करता त्यांच्या देशाने युद्धबंदी नाकारल्याचा पुनरुच्चार केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.