Israel-Hamas Conflict: गाझामधील रुग्णालयावर इस्त्रायलचा हवाई हल्ला, ५०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा

मंगळवारी इस्त्रायलच्या सैन्याने अल अहली रुग्णालयावर हवाई हल्ला केला

92
Israel-Hamas Conflict: गाझामधील रुग्णालयावर इस्त्रायलचा हवाई हल्ला, ५०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा
Israel-Hamas Conflict: गाझामधील रुग्णालयावर इस्त्रायलचा हवाई हल्ला, ५०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा

इस्रायलच्या सैन्याने गाझामधील (Israel-Hamas Conflict)  एका रुग्णालयावर हवाई हल्ला केला असून, त्यात ५०० हून अधिक नागरिकांचा (civilians) मृत्यू झाल्याचा दावा हमासने केला आहे.

इस्त्रायल आणि हमासच्या युद्धात १० लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी उत्तर गाझा सोडले असून आतापर्यंत दोन्हीकडील चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची सांगितले जात आहे.

(हेही वाचा – Israel Double Attack : हमास आणि हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा ‘दुहेरी हल्ला’, १ कमांडर आणि २ दहशतवादी ठार)

हमासने केलेल्या दाव्यानुसार, हा हल्ला मध्य गाझामधील अल अहली रुग्णालयावर झाला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी इस्त्रायलच्या सैन्याने अल अहली रुग्णालयावर हवाई हल्ला केला. या रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येने जखमींना आणि पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला होता.

अल अहली हॉस्पिटलवर एअर स्ट्राइक झाल्यानंतर इमारतीला मोठी आग लागली होती. आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे छायाचित्रांतून दिसत होते. तर आजूबाजूला सर्वत्र मोठ्या प्रमाणात काचा विखुरल्या होत्या. हॉस्पिटलच्या परिसरात अनेक नागरिक मृत्युमुखी पडलेले होते.

पॅलेस्टाईनकडून या हवाई हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. इस्त्रायल सैन्याने विमानातून गाझाच्या रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक केली. त्यात अंदाजे ५०० नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती ट्विटरद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.