Iran Attack On Israel: इस्रायल-इराण संकटावर UN सुरक्षा पथकाची व्हाईट हाऊसमध्ये बैठक, नेतान्याहू म्हणाले…

124
Iran Attack On Israel: इस्रायल-इराण संकटावर UN सुरक्षा पथकाची व्हाईट हाऊसमध्ये बैठक, नेतान्याहू म्हणाले...

इराणने इस्रायलवर हवाई हल्ला सुरू केला. अमेरिका इस्रायलच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. इराण आणि इस्राइल यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रीय सुरक्षा पथकाची भेट घेत आहेत. (Iran Attack On Israel)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले की, इराणने इस्राइलवर केलेल्या हल्ल्यांच्या माहितीसाठी मी नुकताच माझ्या राष्ट्रीय सुरक्षा टीमला भेटलो. इराण आणि त्याच्या प्रॉक्सीकडून येणाऱ्या धोक्यांपासून इस्राइलच्या सुरक्षेसाठी आमची वचनबद्धता कायम आहे. इस्रायला दर्शवलेल्या पाठिंब्याला जो बायडन यांनी “ironclad” हा शब्द वापरला आहे.

इराणच्या हल्ल्यावर इस्राइलने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे. आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी म्हटले की, इराणने इस्राइलवर डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे लष्करी तळाचे नुकसान झाले. ते म्हणतात की, बहुतेक क्षेपणास्त्रे लांब पल्ल्याच्या एरो एअर डिफेन्स सिस्टमद्वारे रोखली गेली. बहुतेक क्षेपणास्त्रे इस्राइलच्या हवाई हद्दीबाहेर टाकण्यात आली. इराणी ड्रोन हल्ल्यासाठी सज्ज असल्याने ते सर्व उड्डाणांसाठी देशाची हवाई हद्द बंद करत आहेत, असे इस्रायली विमानचालन अधिकाऱ्यांनी सांगितले. व्हाईट हाऊस येथील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते एड्रिएन वॉटसन यांनी सांगितले की, अमेरिका इस्रायलच्या लोकांसोबत उभी आहे आणि इराणच्या या धोक्याविरुद्ध त्यांच्या संरक्षणाला पाठिंबा देत आहे.

(हेही वाचा – Amit Shah: साकोलीत अमित शहांची तोफ धडाडणार; राहुल गांधींना काय प्रत्त्युत्तर देणार याकडे लक्ष)

इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्याचा निषेध…
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, इराणने इस्राइलवर केलेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मी या शत्रुत्वाचा तात्काळ अंत करण्याची मागणी करतो. या प्रदेशाला किंवा जगाला दुसरे युद्ध परवडणारे नाही.

इस्राइलचे उत्तर स्पष्ट आणि निर्णायक असेल…
आयडीएफने या हल्ल्याबाबत सांगितले की, इराणने क्षेपणास्त्रे डागली आहेत. तसेच सध्या इस्त्रायली हवाई दलाची अनेक विमाने स्टँडबायवर आहेत, आम्ही कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास तयार आहोत. इस्राइल सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, इराणच्या हल्ल्याला इस्राइलचे उत्तर स्पष्ट आणि निर्णायक असेल.

इस्रायलकडून थेट हल्ल्याची तयारी…
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, अलिकडच्या वर्षांत आणि विशेषत: गेल्या काही आठवड्यांपासून इस्राइल इराणकडून थेट हल्ल्याची तयारी करत आहे. आमच्या संरक्षण यंत्रणा तैनात आहेत. बचाव आणि आक्रमण या दोन्ही बाबतीत आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहोत. इस्राइल मजबूत आहे. आयडीएफ मजबूत आहे. जनता बलवान आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.