Iran Attack On Israel : इराणचा इस्रायलवर ड्रोन हल्ला, लेबनानचे एअरस्पेस बंद

इराणने आपल्या दिशेने १०० हून अधिक ड्रोन डागल्याचा दावाही इस्रायली लष्कराने केला आहे.

139
Iran-Israel attack: इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी, जी-७ नेत्यांची बैठक होणार

इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये अतिशय तणावग्रस्त परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून आहे. इराण कोणत्याही क्षणी हल्ला करेल, असा इशारा देण्यात येत होता, मात्र आता इस्रायलवर ड्रोन हल्ला करून इराणे त्याचे म्हणणे खरे करून दाखवले आहे. इराणने आपल्या हद्दीतून इस्रायवर ड्रोन हल्ला केल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षण दल हाय अलर्टवर असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. (Iran Attack On Israel)

इराणने शनिवारी (१३ एप्रिल) इस्रायलच्या दिशेने डझनभर ड्रोन लॉन्च केले आहेत, मात्र हे ड्रोन इस्रायलला पोहोचण्यासाठी काही तास लागतील, असं इस्रायलच्या सैन्याने म्हटलं आहे. इतकंच नाही, तर इराणने आपल्या दिशेने १०० हून अधिक ड्रोन डागल्याचा दावाही इस्रायली लष्कराने केला आहे.

इस्राइलचे हवाई आणि नौदल या भागावर लक्ष
इराणच्या हल्ल्यानंतर इस्राइलचे संरक्षण दल हाय अलर्टवर असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमाने आणि इस्रायली नौदलाच्या जहाजांसह, IDF ने हवाई संरक्षण श्रेणीलाही हाय अलर्टवर ठेवले आहे. इस्राइलचे हवाई आणि नौदल या भागावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तेल अवीवमध्ये मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे तसेच लेबनानचे एअरस्पेस बंद ठेवण्यात आले आहे.

(हेही वाचा – Jobs in Real Estate : ‘या’ क्षेत्रात महिन्याला सरासरी ८,५०० नोकऱ्यांची वाढ)

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण बंद
इराणने इस्राइलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्राइलच्या डिफेन्स फोर्सने हायअॅलर्ट जारी केला आहे. खबरदारी म्हणून एअरस्पेस बंद करण्यात आले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण थांबवण्यात आलं आहे. आम्ही इराणचे विमान किंवा ड्रोन पाडण्यासाठी सज्ज आहोत, असं इस्रायलने म्हटलं आहे.

आणीबाणी जाहीर
या पार्श्वभूमीवर जॉर्डनमध्ये आणीबाणीदेखील जाहीर करण्यात आली आहे. तसेच डिफेन्स फोर्स सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहे. इराणच्या हल्ल्यात प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायली एअरफोर्सने फायटर जेट आणि नौदलाच्या जहाजांसोबतच एरिअल डिफेन्स एरेलाही हायअलर्टवर ठेवलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.