Interdisciplinary scholar Shirin M. Rai : विद्वान शिरीन राय

91
Interdisciplinary scholar Shirin M. Rai : विद्वान शिरीन राय
Interdisciplinary scholar Shirin M. Rai : विद्वान शिरीन राय

शिरीन एम. राय (Shirin M. Rai) यांचा जन्म १ डिसेंबर १९६२ रोजी नवी दिल्ली येथे झाला. त्यांनी मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी हिंदू कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून बीए चे शिक्षण घेतले आणि दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्र विभागात एमएची पदवी प्राप्त केली. त्यांनी क्राइस्ट कॉलेजमधून चायनीज लिबरलायझेशन ऍंड एज्युकेशनल रिफॉर्म्सवर (Chinese Liberalization and Educational Reforms) डॉक्टरल रिसर्च केला आहे.

(हेही वाचा – India Alliance PM Candidate : राहुल गांधी नाहीत.. ‘हा’ असू शकतो पंतप्रधानपदाचा चेहरा ?; सोनिया गांधी यांचे संकेत)

१९८९ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वारविक (University of Warwick) येथे त्या डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिक्स ऍंड इंटरनॅशनल स्टडीजमध्ये (Department of Politics and International Studies) त्या पूर्णवेळ महिला लेक्चरर म्हणून रुजू झाल्या. विशेष म्हणजे तिथे त्या पहिल्या महिला लेक्चरर होत्या. २०२२ पर्यंत त्यांनी नोकरी केली. आता त्या एसओएएस, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिक्स ऍंड इंटरनॅशनल स्टडीजमध्ये प्रतिष्ठित संशोधक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.

आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, वसाहतोत्तर शासन, संस्था आणि लोकशाहीकरणाच्या प्रक्रिया आणि जेंडर रिजिम्स यांच्यातील छेदनबिंदूंवरील संशोधनासाठी त्यांना ओळखले जाते. जुलै २०२२ मध्ये त्यांना ब्रिटीश इंटरनॅशनल स्टडीज असोसिएशन डिस्टिंग्युइश कॉंट्र्युबिशन (British International Studies Association Distinguished Contribution) पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०२१ मध्ये राय यांची ब्रिटिश अकादमीचे फेलो म्हणून निवड झाली. राय यांना २०१५ मध्ये इंटरनॅशनल स्टडीज असोसिएशनने स्त्रीवादी सिद्धांत आणि जेंडर स्टडीज एमिनेंट स्कॉलर पुरस्काराने सन्मानित केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.