Drug Business Seized : बेकायदेशीर ड्रग्सच्या धंद्यातून कमावलेली संपत्ती पोलिसांकडून जप्त 

60
Drug Business Seized : बेकायदेशीर ड्रग्सच्या धंद्यातून कमावलेली संपत्ती पोलिसांकडून जप्त 
Drug Business Seized : बेकायदेशीर ड्रग्सच्या धंद्यातून कमावलेली संपत्ती पोलिसांकडून जप्त 
ड्रग्सच्या बेकायदेशीर धंद्यातून कमावलेली कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मुंबई गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने काही महिन्यांपूर्वी ड्रग्स तस्करांचे (Drug Business Seized) एक मोठे रॅकेट उध्वस्त केले होते. या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली होती, त्यापैकी एका महिलेसह ६ जणांची ३ कोटी रुपये किमतीची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेने १६ ऑगस्ट या महिण्यात अंमली पदार्थांची (ड्रग्स) तस्करी करणाऱ्या टोळीविरुद्ध कारवाई केली होती.या प्रकरणी गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ रोकड आणि सोनं जप्त करण्यात आले होते. या पूर्ण कारवाईत १२ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. या टोळीविरुद्ध कलम ४२०,४६५,४६८,४७१ तसेच अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस)१९८५  कलम २२(सी), ८(सी), २०,२९अंतर्गत गुन्हा दाखल केला. अटक करण्यात आलेल्या १२ जणांपैकी टोळीचा सूत्रधार सरफराज शाबीर अली खान, गोल्डन भुरा (३६), साहिल रमजान अली खान, मस्या (२७), कैनत खान (२८) आणि प्रियांका करकौर(२४) या ६ जणांची पोलिसांनी स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

(हेही वाचा-Kaka Kalelkar : हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्यासाठी धडपडणारे काका कालेलकर)

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्याला अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे ३५ हजार रुपये रोख आणि ५१.८४० ग्रॅम सोने मिळून आले होते. जप्त करण्यात आलेली मालमत्ता (Drug Business Seized) ही मालेगाव, नाशिक आणि कल्याण शिळफाटा या ठिकाणची आहे.
आणखी एक आरोपी कैनात खान याच्याकडे नवी मुंबईतील घणसोली येथे रो हाऊस आणि शिळफाटा येथील घर असून, ते दोन्ही जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, प्रियांका करकौरच्या घरातून गोल्डन भुराजवळ एक क्रेटा कार आणि मुंब्रा येथील फ्लॅटसह १७.०४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. (Drug Business Seized) डीसीपी रोशन यांनी स्पष्ट केले की, ही सर्व मालमत्ता ड्रग्जच्या व्यवसायातून मिळवण्यात आली होती. पोलिसांनी तपासादरम्यान या मालमत्तेची माहिती आयकर कार्यालयाला दिली, ज्याने नंतर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=0_ctu_EWhMQ

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.