General Manoj Pandey : भारतीय लष्करप्रमुख टांझानिया भेटीवर; दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांना मिळणार बळकटी

124
General Manoj Pandey : भारतीय लष्करप्रमुख टांझानिया भेटीवर; दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांना मिळणार बळकटी

भारतीय लष्कराचे प्रमुख (COAS) जनरल मनोज पांडे (General Manoj Pandey) सध्या टांझानियाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा २ ते ५ ऑक्टोबर असा असणार आहे. लष्करप्रमुखांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संरक्षण संबंधांना बळकटी मिळेल.

लष्कर प्रमुख टांझानियाची (General Manoj Pandey) राजधानी दार ए सलाम, ऐतिहासिक शहर झांजीबार आणि अरुशा यां शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते टांझानियातील अनेक मान्यवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि बैठका घेतील. तसेच टांझानियाच्या केंद्रीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्ष महामहीम सामिया सुलुहू हसन यांचीही भेट घेतील.

भारत आणि टांझानियामधील (General Manoj Pandey) द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत आणि समृद्ध आहेत. ऑक्टोबर 2003 मध्ये संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करुन दोन्ही देशांनी या संबंधांची मजबूत पायाभरणी केली आहे. या वर्षी 28 आणि 29 जून रोजी टांझानियामधील अरुशा येथे झालेल्या भारत-टांझानिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या दुसऱ्या बैठकीत हे सहकार्य आणखी दृढ झाले आहे.

भारत आणि टांझानिया दोन्ही देशांची (General Manoj Pandey) सैन्य दले व्यावसायिक लष्करी अभ्यासक्रमांमध्ये एकमेकांसाठी जागा रिक्त ठेवतात. यामुळे दोन्ही देशांतील कर्मचाऱ्यांना मजबूत बंध निर्माण करण्यास, विचारांची देवाणघेवाण करण्यास आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यास मदत झाली आहे. टांझानियन सैन्य दल गेल्या पाच वर्षांपासून भारतात आयोजित संयुक्त राष्ट्र शांतता स्थापन प्रशिक्षणात सातत्याने सहभागी होत आहे. त्याचप्रमाणे, 2017 पासून कमांड अँड स्टाफ कॉलेज, दुलुटी येथे भारतीय लष्कराचे प्रशिक्षण पथक तैनात करण्यात आले आहे.

(हेही वाचा – India Vs Canada : भारत सरकारची कॅनडाला चेतावणी; राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलवा)

दोन्ही देशांमधील गहन लष्करी सहकार्याचे प्रतीक म्हणून टांझानियन (General Manoj Pandey) लष्करी शिष्टमंडळे नियमितपणे भारताला भेट देत आहेत. अलीकडच्या काळात, टांझानियन शिष्टमंडळांनी एरो इंडिया 23, इंडो आफ्रिका आर्मी चीफ्स कॉन्क्लेव्ह-23 आणि AFINDEX-23 मध्ये लक्षणीय उपस्थिती दर्शवली. टांझानियातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनीही डेफ एक्स्पो 22 दरम्यान भारताला भेट दिली तर अलीकडेच त्यांनी 13 व्या IPACC, 47 व्या IPAMS आणि 9 व्या SELF 23 चा समारोप समारंभात हजेरी लावली होती.

लष्कर प्रमुखांची (General Manoj Pandey) ही भेट भारत आणि टांझानिया दरम्यान स्थापित उच्च-स्तरीय द्विपक्षीय संरक्षण प्रतिबद्धता आणि घनिष्ठ संरक्षण संबंधांना आणखी मजबूत करेल. या भेटीमुळे केवळ विद्यमान सहकार्याला बळकटीच मिळत नसून भविष्यातील मजबूत भागीदारीसाठी मार्ग खुला करण्याची हमी मिळत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.