India – Canada Crisis : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो पुन्हा बरळले; म्हणाले..

100
India - Canada Crisis : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो पुन्हा बरळले; म्हणाले..

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी भारत आणि कॅनडा (India – Canada Crisis) यांच्यातील तणाव अद्याप निवळलेला दिसत नाही. अलीकडेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा भारतावर टीका केली आहे.

अमेरिकेतील भारतीय नागरिक निखिल गुप्ता (India – Canada Crisis) याच्यावर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. यामध्ये भारताचा सहभाग असल्याचा दावाही केला जात आहे. यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा भारतावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

(हेही वाचा – India To Tour Sri Lanka : भारतीय संघ पुढील वर्षी श्रीलंकेत खेळणार ६ एकदिवसीय व टी-२० सामने )

आम्ही हेच सुरुवातीपासून सांगत होतो. मात्र, अमेरिकेतून (India – Canada Crisis) येणाऱ्या माहितीमुळे यावर शिक्कामोर्तब होत आहे, असे ट्रुडो यांनी सांगितले. कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला आहे. मात्र, याबाबत कॅनडाकडून ठोस पुरावा देण्यात आलेला नाही.

(हेही वाचा – Unseasonal Rain : शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत मदत; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय)

भारताकडून (India – Canada Crisis) सातत्याने पुरावा देण्याची मागणी केली जात असून, तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अमेरिकेने केलेल्या दाव्यानंतर आता ट्रुडो म्हणाले की, “अमेरिकेतून येणारी माहिती आम्ही जे आधीपासून सांगत होतो, त्याला अधोरेखित करणारी आहे. भारताला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. भारत सरकारने आमच्यासोबत काम करणे आवश्यक आहे जेणेकरून आम्ही या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ शकू, असे ट्रुडो यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.