मुंबईतील होर्डिंग्ज सुरक्षितच!

153
hoarding in Mumbai are safe, according to the municipal corporation
मुंबईतील होर्डिंग सुरक्षितच!

मुंबईत मोठमोठी जाहिरात होर्डिंग्ज लावण्यात आली असून ही सर्व होर्डिंग्ज आज सुरक्षित असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. महापालिकेच्या नोंदीवर सध्या १०५५ होर्डिंग्ज आहेत. या सर्व होर्डिंग्जच्या परवान्यांना दर दोन वर्षांनी परवानगी दिली जाते. यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक केले आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणत्याही होर्डिंगच्या परवान्यांचे नुतनीकरण होत नाही. त्यामुळे मुंबईतील सर्व होर्डिंग (Mumbai Hoarding)
हे सुरक्षित असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आतापर्यंत महापालिकेच्यावतीने १०५५ होर्डिंगचे परवाने देण्यात आले

मुंबईमध्ये २०१९ पूर्वी सुमारे १३०० होर्डिंगची संख्या होती. परंतु त्यानंतर मुंबईतील होर्डिंग (Mumbai Hoarding) धोरण ठरवण्यात आल्यानंतर त्यातील निकषानुसार त्यांना परवान्यांचे नुतनीकरण करण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत महापालिकेच्यावतीने १०५५ होर्डिंगचे परवाने देण्यात आले होते, यासर्व परवान्यांचे नुतनीकरण करताना संबंधितांना शुल्कासहित स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे त्यानुसारच सर्व परवान्यांचे नुतनीकरण केले जात असल्याची माहिती परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Lower Parel Bridge: मुंबईकरांसाठी गुडन्यूज; लोअर परळ पूल १५ जुलैआधी होणार)

मुंबईतील काही परवान्यांचे नुतनीकरण हे स्ट्रक्चरल ऑडिटसह, शुल्क तसेच विविध प्रकारची एनओसी या अभावी अनेक होर्डिंगच्या परवान्यांचे नुतनीकरण झालेले नाही. परंतु या नुतनीकरण न झालेल्या संबंधित कंपन्यांना नोटीस बजावण्यात येत आहे. मुंबईतील यासर्व होर्डिंगवर (Mumbai Hoarding) जीआयएस मॅपिंगच्याद्वारे विशेष लक्ष महापालिका ठेवून असून ज्या होर्डिंगच्या परवान्यांची मुदत संपली, त्याची माहिती तात्काळ महापालिकेला समजते आणि त्यानुसार त्याच्या परवान्यांचे नुतनीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना नोटीस पाठवली जाते. त्यामुळे प्रत्येक होर्डिंगवर (Mumbai Hoarding) महापालिकेचे लक्ष असल्याने प्रत्येक होर्डिंगच्या सुरक्षेकडेही तेवढेच गांभीर्याने पाहिले जाते, असे महापालिकेच्या परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.