Raj Thackeray : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांना राज ठाकरेंनी दिला सल्ला, उद्धव ठाकरेंविषयी म्हणाले… 

राज ठाकरे यांनी एका लाईव्ह मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांना रॅपिड फायर सारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागले.

241

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी एका लाईव्ह मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांना रॅपिड फायर सारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागले, तेव्हा त्यांनी राज्यातील प्रमुख नेते असलेल्यांना या रॅपिड फायरवर उत्तरे देताना एका शब्दांत सल्ले दिले.

मुलाखत घेताना मुलाखतकार अमृता फडणवीस यांनी तुम्ही कोणत्या नेत्यांना काय सल्ले देणार असे विचारात एकनाथ शिंदे यांना काय सल्ले द्याल, त्यावर राज ठाकरे Raj Thackeray यांनी ‘जपून रहा’, असे उत्तर दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना काय सल्ला द्याल, असे विचारताच वरती संबंध नीट ठेवा, असे म्हटले, अजित पवार यांचे नाव घेताच ‘बाहेर जेवढे लक्ष देता तितकेच काकांकडे लक्ष द्यावे, असे म्हटले. तर उद्धव ठाकरे यांचे नाव विचारताच ‘मी काय बोलणार, ते स्वयंभू आहेत’, असे म्हणाले. तर आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले असता ‘तेही स्वयंभू आहेत’, असे म्हणाले. अजित पवार यांच्या विषयी उत्तर देताना राज ठाकरे Raj Thackeray यांनी आपण यावर पुढच्या महिन्यात रत्नागिरीत होणाऱ्या सभेत बोलणार आहे, असे नमूद केले.

(हेही वाचा ‘…तर मी घरचे काम करायला तयार’: मिसेस उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ प्रश्नावर राज ठाकरेंचे उत्तर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.