Hindu in Chhattisgarh : ख्रिस्ती मिशनरी, नक्षलवादी आणि धर्मांध यांच्या अभद्र युतीत अडकलेले छत्तीसगडमधील हिंदू सुशासनाच्या प्रतीक्षेत

Hindu in Chhattisgarh : छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांची समस्या सर्वांना माहिती आहे; परंतु तेथील आदिवासींचे धर्मांतर, त्यांना हिंदु धर्मापासून तोडण्याचा डाव, गोतस्करी या समस्यांनीही तेथील हिंदुत्व घेरलेले आहे.

242
Hindu in Chhattisgarh : ख्रिस्ती मिशनरी, नक्षलवादी आणि धर्मांध यांच्या अभद्र युतीत अडकलेले छत्तीसगडमधील हिंदू सुशासनाच्या प्रतीक्षेत
Hindu in Chhattisgarh : ख्रिस्ती मिशनरी, नक्षलवादी आणि धर्मांध यांच्या अभद्र युतीत अडकलेले छत्तीसगडमधील हिंदू सुशासनाच्या प्रतीक्षेत

सुनील घनवट

छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप अनपेक्षितरित्या सत्तेवर आला आहे. (Chhattisgarh election 2023) तेथे भाजपला (BJP) ५४ जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला ३५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. छत्तीसगडमधील जनतेने काँग्रेसच्या (Congress) कारभाराविषयीचा रोष मतपेटीतून दाखवला आहे. हिंदूबहुल असूनही छत्तीसगडमध्ये हिंदूंची स्थिती भीषण आहे. छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांची समस्या सर्वांना माहिती आहे; परंतु तेथील आदिवासींचे धर्मांतर, त्यांना हिंदु धर्मापासून तोडण्याचा डाव, गोतस्करी या समस्यांनीही तेथील हिंदुत्व घेरलेले आहे. काँग्रेसच्या (Congress) काळात या सगळ्याला खत-पाणीच घातले गेले. थोडक्यात सांगायचे, तर आता विद्यमान सरकारला छत्तीसगडमध्ये ९३.२५ टक्के लोकसंख्या असलेल्या हिंदू समाजासाठी करण्यासारखे खूप काही आहे.

(हेही वाचा – Sanjay Raut : संजय राऊत यांच्या गाडीवर फेकली चप्पलने भरलेली पिशवी; समर्थन करत कार्यकर्ता म्हणाला…)

ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून हिंदूंचे अवैध धर्मांतर

जागोजागी चर्चची उभारणी : काँग्रेसचे नेते अजित जोगी यांच्या कार्यकाळात छत्तीसगड राज्यात ख्रिस्ती धर्मांतराला (Illegal conversion) सोनियाचे दिवस आले. जागोजागी चर्च उभारले गेले. पुढे भाजपचे रमण सिंह यांच्या सरकारच्या काळातही हे प्रकार थांबवले गेले नाहीत.

आशिया खंडातील दुसरे मोठे चर्च छत्तीसगडमध्ये आहे. एका वेळी १० हजार लोक प्रार्थना करू शकतील, एवढे मोठे चर्च जशपूर जिल्ह्यातील कुनकुरी (kunkuri church chhattisgarh) येथे आहे. छत्तीसगड (Chhattisgarh), झारखंड (Jharkhand) आणि ओडिशा (Odisha) राज्यांतील  ख्रिस्ती मिशनऱ्यांचे हे हब झाले आहे. तेथील अनेक ख्रिस्ती या चर्चमध्ये प्रार्थना करायला येतात.

सरकारी अधिकाऱ्यांमध्येही ख्रिस्ती मिशनऱ्यांचा सुळसुळाट : हिंदूंचे मोठ्या प्रमाणात होणारे धर्मांतर ही छत्तीसगडमधील हिंदुत्वासमोरची मोठी समस्या आहे. छत्तीसगडमध्ये आदिवासी समाज लक्षणीय आहे. तेथील आदिवासी, अविकसित हिंदूंना आरोग्य, शैक्षणिक आणि आर्थिक अशा सुविधांचे आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहेत. एवढ्यावरच न थांबता चतुर्थश्रेणी सरकारी अधिकाऱ्यांना पदोन्नतीचे आमीष दाखवून धर्मांतरित केले जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांमध्येही ख्रिस्ती मिशनऱ्यांचा (Christian missionaries) सुळसुळाट झाला आहे.

(हेही वाचा – Sumedha Warship At Kenya : भारतीय नौदलाचे जहाज ‘सुमेधा’ केनियामधील पोर्ट लामू येथे दाखल)

आदिवासींमध्ये हिंदूविरोधी संघटनांच्या कारवायांना जोर

आदिवासी भागांत बामसेफसारख्या (BAMCEF) राष्ट्रविरोधी संघटनांच्या कारवायांनी जोर पकडला आहे. तेथील आदिवासींमध्ये हिंदूविरोधी भावना रुजवली जात आहे. त्यामुळे आदिवासी भागांत ‘आदिवासी हूं, हिंदू नही हूं’, अशी भावना वाढत आहे. तेथील अनेक आदिवासींनी देव विसर्जित केले आहेत. ते आता त्यांच्या घरात बायबल ठेवतात. आदिवासींनी मंदिरांनाही टाळे ठोकलेले आहे. यामागेही ख्रिस्ती आणि हिंदूविरोधी संघटनाच आहेत.

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या

रमण सिंह सरकारच्या काळात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांमध्येही वाढ झाली होती; परंतु सरकारने त्या वेळी हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केलेल्या नाराजीकडे सपशेल दुर्लक्ष केले होते.

हिंदू संतांचा छळ

एकीकडे ख्रिस्ती मिशनऱ्यांना मोकळे रान सोडलेले असताना हिंदू संतांच्या आश्रमाला मात्र लक्ष्य केले जात आहे. गोरक्षणाचे कार्य अत्यंत तळमळीने करणारे चामडी पाटेश्वर धामचे संत प.पू. बालकदासजी महाराज (PP Balakdasji Maharaj) यांच्या आश्रमाच्या भूमीवरून महाराजांना काँग्रेसच्या काळात पुष्कळ त्रास सहन करावा लागला.

वर्ष २०२१ मध्ये रायपूर (Raipur) येथे संत संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात सहभागी झालेले संत कालीचरण महाराज (Saint Kalicharan Maharaj) यांना रायपूर पोलिसांनी एका विधानासाठी अटक केली.

साधू संतांच्या या अवमानामुळे अनेक हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना सरकारवर नाराज झाल्या. त्याचे दुष्परिणाम पुढे सरकारला भोगावे लागले.

(हेही वाचा – Central Railway: कसारा-इगतपुरी स्थानकादरम्यान मालगाडी रुळावरून घसरली, मुंबईतील वाहतूक विस्कळीत)

वाढती व्यसनाधीनता

छत्तीसगडला (Chhattisgarh) ‘धान का कटोरा’ म्हटले जाते. येथे सरकारने रेशनिंगपासून ते आरोग्यसुविधांपर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातून लोकांना अनेक जीवनावश्यक वस्तू फुकट वाटल्या जात आहेत. त्यामुळे लोकांना खाण्या-पिण्यासाठी कष्ट केलेच पाहिजेत, अशी स्थिती राहिलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

आदिवासींची भूमी बळकावण्यासाठी हिंदू मुलींची फसवणूक

कायद्यानुसार आदिवासींच्या जागा अन्य कोणी विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे जंगलातील त्यांच्या मोक्याच्या जागा बळकावण्यासाठी आदिवासी मुलींशी लग्न करून त्यांच्या जागा ताब्यात घेतल्या जात आहेत.

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण

काँग्रेसचे मंत्री महंमद अकबर (Muhammad Akbar) यांच्या कार्यकाळात वनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. रायपूरमध्ये विमानतळाच्या जागेवर अतिक्रमण त्यांच्याच कार्यकाळात झाले आहे.

गोतस्करी आणि गोहत्या

छत्तीसगडमध्ये गोहत्यांचे प्रमाण पुष्कळच आहे. येथून महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा, कर्नाटक राज्य येथे गोतस्करी केली जाते. छत्तीसगड सरकारने मध्यंतरी गोमय (गायीचे शेण) विकत घेण्याची एक योजना आणली होती. त्याचबरोबर गोठाण योजना काँग्रेस (Congress) सरकारने आणली होती. गोवंशाची जोपासना करण्यास प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट देणार असल्याचे सरकारने यावेळी सांगितले होते. प्रत्यक्षात हे पुतना मावशीचे प्रेम आहे, कारण गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी तेच सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नाही.

(हेही वाचा – Bhagwant Mann Allegations : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर मुलीचे गंभीर आरोप; ते दारू पितात आणि…)

गोरक्षण करताना अनेक गोरक्षकांवर गोतस्कर हल्ले करतात. सरकार या हल्ल्यांच्या प्रकरणी कोणतीही कारवाई करत नाही. उलट गोरक्षक करत असलेल्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करते.

छत्तीसगडमध्ये देशातील मोठी नक्षलवादी चळवळ (naxalite movement) आहे. येथे ख्रिस्ती मिशनरीही मोठ्या प्रमाणात कारवाया करत आहेत. यात आता मुसलमानांच्या कारवायांची भर पडली आहे. ख्रिस्ती मिशनरी, नक्षलवादी आणि धर्मांध यांच्या अभद्र युतीत येथील हिंदु अडकला आहे.

येथील स्थानिक भाषेत ‘छत्तीसगढीया, सबले बढिया’ असे म्हटले जाते. याचा अर्थ छत्तीसगड हे सर्वात चांगले आहे. या म्हणीप्रमाणे छत्तीसगड राज्य होण्यासाठी आता भाजप सरकारने प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! (Hindu in Chhattisgarh)

(लेखक हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र, गोवा आणि छत्तीसगड राज्य समन्वयक आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.