Dheeraj Sahu: नोटांचा डोंगर घरात सापडला, धीरज साहू अडचणीत

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन राज्यातील अर्ध्या डझानाहून अधिक जागांवर बुधवारी छापे मारले.

273
Dheeraj Sahu: नोटांचा डोंगर घरात सापडला, धीरज साहू अडचणीत
Dheeraj Sahu: नोटांचा डोंगर घरात सापडला, धीरज साहू अडचणीत

झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू (Dheeraj Sahu) सध्या बऱ्याच चर्चेत आहेत. त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यांच्या घरातून इतक्या नोटा सापडल्या की त्या मोजता मोजता तिथली मशीन्सही बिघडली. टॅक्स चोरीच्या संशयावरून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. आयकर विभागाच्या टीमसोबत सीआयएसएफचे जवानही सामील होते शिवाय कॉंग्रसकडूनच आपल्या नेत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन राज्यातील अर्ध्या डझानाहून अधिक जागांवर बुधवारी छापे मारले. आयकर विभागाने झारखंड आणि ओडिशामधील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (दारू उत्पादन कंपनी) वर छापा टाकला आणि कंपनीशी संबंधित परिसरातून मोठ्या प्रमाणात चलनी नोटा जप्त केल्या.

(हेही वाचा – Central Railway: कसारा-इगतपुरी स्थानकादरम्यान मालगाडी रुळावरून घसरली, मुंबईतील वाहतूक विस्कळीत)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूर आणि झारखंडच्या रांची आणि लोहरदगा येथे शोध घेण्यात आला. त्या ठिकाणाहून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटांची मोजणी करण्यात आली. पण नोटांचा डोंगर इतका प्रचंड होता, की त्या अगणित नोटा मोजता-मोजता मशीनच बंद पडलं. करचुकवेगिरीच्या संशयावरून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी साहू यांच्या मालकीच्या अनेक जागांवर छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान आयकर विभागाच्या टीमसोबत सीआयएसएफचे जवानही सामील होते.

बुधवारी या छाप्यांना सुरूवात झाली आणि खात्याच्या अधिकार्‍यांनी नोट मोजणी यंत्राचा वापर करून रोख रक्कम तपासली, असे सूत्रांनी सांगितले. साहू यांच्या घरात मारलेल्या छाप्यामध्ये सापडलेली सर्व रोकड ही बेहिशोबी असल्याचे दिसते. सापडलेल्या या सर्व नोटा बँकेत नेण्यासाठी तब्बल १५७ बॅग्ज खरेदी करण्यात आल्या, मात्र शेवटी त्याही कमीच पडल्या. अखेर पैसे नेण्यासाठी तेथे गोण्या आणण्यात आल्या. त्यानंतर सर्व नोटा ट्रकमध्ये भरून बँकेत नेण्यात आल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.