Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामीजींचे शब्द प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात आहेत; सुरेश चव्हाणके यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा

Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामीजींनी 'अमृत महोत्सवही कसा साजरा केला जाऊ शकतो', याची शिकवण समाजाला देण्यासाठी स्वतःचा अमृत महोत्सव साजरा करण्याची अनुमती दिली, असे मला वाटते. नुकताच आळंदीमध्ये भव्य कार्यक्रम झाला.

140
Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामीजींचे शब्द प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात आहेत; सुरेश चव्हाणके यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा
Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामीजींचे शब्द प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात आहेत; सुरेश चव्हाणके यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. ४० वर्षांपूर्वी एका शिबिरात गटनायक म्हणून स्वामीजींची आणि माझी ओळख झाली होती. तेव्हा जी तेजस्वी वाणी होती, तीच वाणी, तेच हिंदुत्व आजही पहायला मिळत आहे. एकदा मी त्यांना विचारले होते की, आपण केव्हापासून का कार्यात आहात, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ”पाळण्यात होतो, तेव्हापासून मी स्वयंसेवक आहे.” त्यांच्या रोमारोमात हिंदुत्व आहे. आता तर त्यांचे शब्द प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात आहेत, असे गौरवोद्गार ‘सुदर्शन न्यूज’चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी काढले. (Govind Dev Giri Ji Maharaj)

ते १४ जानेवारी रोजी दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संपन्न झालेल्या स्वामीजींच्या अमृत महोत्सव सन्मान सोहळ्यात बोलत होते. (Govind Dev Giri Ji Maharaj) हा सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि हिंदु जनजागृती समिती (Hindu Janajagruti Samiti) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

(हेही वाचा – Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत व्हावे; रमेश शिंदे यांनी केला गुणगौरव)

या वेळी व्यासपिठावर विधानपरिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, आमदार आणि भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, भाजपचे आमदार अधिवक्ता आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे (Hindu Janajagruti Samiti) राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

… यासाठी आळंदीच्या सोहळ्याला अनुमती दिली !

या प्रसंगी बोलतांना सुरेश चव्हाणके पुढे म्हणाले की, आळंदी येथे ७५ संतांचा सन्मान करून स्वामीजींचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. त्याद्वारे स्वामीजींनी ‘अमृत महोत्सवही कसा साजरा केला जाऊ शकतो’, याची शिकवण समाजाला देण्यासाठी स्वतःचा अमृत महोत्सव साजरा करण्याची अनुमती दिली, असे मला वाटते. नुकताच आळंदीमध्ये भव्य कार्यक्रम झाला. तशीच त्यांची भव्य शताब्दीही साजरी करण्याचे सौभाग्य मिळावे, अशी मी इच्छा व्यक्त करतो.

हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करा

आज १४ फेब्रुवारीच्या दिवशी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला हिंदूंना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी २० वर्षांपूर्वी सुदर्शन चॅनलच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा करण्याचा प्रारंभ झाला. गुरु पितृस्थानी असतात. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांनी काही संकल्प करावा, असे मला वाटते. ‘हिंदु राष्ट्र घोषित व्हावे’, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे’, असे आवाहनही या वेळी चव्हाणके यांनी केले.

(हेही वाचा – Govind Dev Giri Ji Maharaj : अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प.पू. स्वामी गोविंद देवगिरि महाराज यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य सन्मान)

स्वामीजींसारख्या व्यक्तींनी आयुष्याचा होम करून राममंदिर उभे केले ! – अतुल भातखळकर, आमदार आणि प्रवक्ते, भाजप

New Project 2024 02 14T220316.888

या कार्यक्रमात बोलायची संधी मिळत आहे, यासाठी स्वतःला गौरवांकित समजतो. स्वामीजींसमोर मी बोलणे म्हणजे ‘ज्योतीने तेजाची आरती’, असेच आहे. मी सर्वार्थाने लहान कार्यकर्ता आहे. लहानपणापासून हिंदुत्वाच्या विचारधारेत वाढलो; म्हणून ही संधी मिळाली, असे मी मानतो.

स्वामीजींनी भारतीय संस्कृतीचा प्रसार केला, हिंदुत्वाच्या विचारांचा प्रचार केला. स्वामीजींसारख्या व्यक्तींनी आयुष्याचा होम करून कार्य केले. आपल्याला २२ जानेवारी २०२४ ला झालेल्या अयोध्येतील श्रीरामललाच्या प्रतिष्ठापनेचे श्रेय जाते. आपले विचार, आपली वाणी अस्खलित आहे. २२ जानेवारीच्या सोहळ्यातील भाषणात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, तेव्हा अंगावर रोमांच उभा राहिला नाही, अशी या देशातील एक व्यक्ती नाही. आपले विचारकण घेत घेत लक्षावधी लोक या समाजाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आपली शताब्दी साजरी करण्याचे भाग्य मिळावे, अशी इच्छा व्यक्त करतो.

या वेळी अन्य मान्यवरांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. (Govind Dev Giri Ji Maharaj)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.