गुगलचा चॅटबॉट चॅटजीपीटीला टक्कर देणार की आपटणार?

145
गुगलचा चॅटबॉट चॅटजीपीटीला टक्कर देणार की आपटणार?
गुगलचा चॅटबॉट चॅटजीपीटीला टक्कर देणार की आपटणार?

मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात ओपनएआय या कंपनीने चॅटबॉट लाँच केला होता. सर्वसामान्य युजर्ससाठी खुले झाल्या झाल्या चॅटजीपीटीने जागतिक विक्रम रचला होता. अवघ्या पाच दिवसांत दहा दशलक्ष माणसांनी चॅटजीपीटीचा वापर केला होता. या एआयच्या आगमनामुळे इतर सर्च इंजिनचे काय होणार हा प्रश्न पडला होता.

अधिक शक्तीशाली

काही महिन्यांपूर्वी चॅटजीपीटाला टक्कर देण्यासाठी गुगलने एका एआय चॅटबॉटची घोषणा केली होती. त्याचे नाव बार्ड असे आहे. त्याचा वापर करण्यासाठी युजर्स कधीपासून प्रतीक्षा करत होते. वाट पाहणाऱ्यांसाठी गुगलने एक प्रतीक्षा यादी बनवली होती. मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे. जगातील १८० देशातले सर्व युजर्स या बार्डचा वापर करू शकतात. पुढे इतर प्रादेशिक भाषांचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र सध्या फक्त इंग्रजी, जपानी आणि कोरियन भाषाच उपलब्ध आहेत.

गुगल बार्डची विशेषता

कोणत्याही प्रश्नाचे सविस्तर उत्तर बार्ड देऊ शकतो. विचारलेल्या प्रश्नाचे टेक्स्ट आणि इमेज बेस्ड उत्तर प्रश्नकर्त्याला मिळेल.

  • प्रश्नाचे उत्तर फोटो स्वरुपात मिळेल
  • २०+ प्रोग्रामिंग भाषांमुळे कोडींग सहज होणार
  • गुगल डॉक्स, गुगल ड्राईव्ह, गुगल मॅप्स यांच्याशी संबंधिक कामे गुगल बार्ड डायरेक्ट करू शकतो
  • लवकरच ४० भाषांत प्रश्न-उत्तरे उपलब्ध होतील

(हेही वाचा –  Password : ‘या’ १० प्रकारचे पासवर्ड कधीच ठेऊ नका; हॅकर्स लगेच ओळखू शकतात)

बार्डचा वापर करण्यासाठी…

चॅटजीपीटीच्या चार पावले पुढे जाण्यासाठी गुगलने कंबर कसली आहे. याचा वापर सध्या प्रायोगिक तत्त्वावर आहे. एआयने दिलेली उत्तरे नेहमीच अचूक असतील असे नाही. याचा वापर करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

  • गुगल उघडा
  • गुगल बार्ड असे शोधा
  • युज बार्ड हा पर्याय निवडा
  • सर्व अटींचा स्वीकार करा
  • बार्डला प्रश्न विचारा

बार्डचा पराक्रम

फेब्रुवारीच्या एका जाहीर कार्यक्रमात चॅटबॉटचे प्रात्यक्षिक चालू होते. तेव्हा गुगलच्या एआयकडून एक चूक झाली होती. या चुकीमुळे गुगलचे शेअर पडले आणि कंपनीला १०० अब्जांचे नुकसान झेलावे लागले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.